Wed, Feb 8, 2023

जंक्शनमधील चौघांवर
शिवीगाळप्रकरणी गुन्हा
जंक्शनमधील चौघांवर शिवीगाळप्रकरणी गुन्हा
Published on : 14 January 2023, 2:36 am
वालचंदनगर, ता. १४ : जंक्शन (ता. इंदापूर) येथे महिलेला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी गणेश वसंत ठोंबरे, प्रदिप वसंत ठोंबरे, शुभम प्रदिप ठोंबरे, भरत प्रदिप ठोंबरे (रा. सर्व जंक्शन) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ३०) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जंक्शनमधील अलका नामदेव लोहकरे (वय ५५) या महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (ता. १३) गुन्हा दाखल केला असून, तपास बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.