अपघात टाळण्यासाठी वाहनांना रिफ्लेक्टर लावा : भरणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात टाळण्यासाठी वाहनांना रिफ्लेक्टर लावा : भरणे
अपघात टाळण्यासाठी वाहनांना रिफ्लेक्टर लावा : भरणे

अपघात टाळण्यासाठी वाहनांना रिफ्लेक्टर लावा : भरणे

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १४ : ''''सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून, रस्त्यावर वाहनांची गर्दी आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावरील चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवा,'''' असे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले.
भवानीनगर (ता.इंदापूर) येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आवारामध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक बाळासाहेब पाटील, अॅड. रणजित निंबाळकर, राजेंद्र गावडे, नारायण कोळेकर, निवृत्ती सोनवणे गोपीचंद शिंदे, दत्तात्रेय सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, युवराज रणवरे, सणसर सरपंच पार्थ निंबाळकर, कुरवलीचे सरपंच राहुल चव्हाण, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते.

बारामती परिवहन विभागाने बारामती परिवहन कार्यालय अपघात मुक्त करण्याचा संकल्प घेतलेला आहे. ट्रॅक्टर टेलरचे वाहन चालवण्याचे परवाने देण्याची यंत्रणा सध्या बारामतीतच सुरू असून चालकांनी एकत्र परवाना काढण्याची मागणी केल्यास त्यांच्यासाठी शिबिर आयोजित करून परवाना दिला जाईल.
- राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

02898