
वालचंदनगर, लासुर्णे येथे मटक्याच्या अड्ड्यांवर छापे
वालचंदनगर, ता. १८ : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वालचंदनगर व लासुर्णे परिसरामध्ये वालचंदनगर पोलिसांनी मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सोमवारी (ता. १६) रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास लासुर्णे गावामध्ये छापा टाकून रवींद्र नारायण लोंढे, सचिन ऊर्फ खपीर बाबा गायकवाड (दोघेही रा. लासुर्णे) यांच्या मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकून २३८० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. तसेच, वालचंदनगरमध्ये रात्री आठ वाजता मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकून बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड, सचिन ऊर्फ खपीर बाबा गायकवाड, निखिल गायकवाड, दिगंबर हेगडे (रा. सर्व रा. वालचंदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला करून ३०२० रुपयांच्या रोख रक्कमेसह एक मोबाईल व इतर वस्तू, असा १४ हजार ३९० रुपयांचा ऐवज जप्त केला. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.