Tue, March 21, 2023

उद्घट येथून ५ बोकडांची चोरी
उद्घट येथून ५ बोकडांची चोरी
Published on : 30 January 2023, 10:32 am
वालचंदनगर, ता. ३० ः उद्घट (ता. इंदापूर) येथून चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीचे ५ बोकड चोरल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यानी शुक्रवारी (ता. २७) रोजी आबासाहेब भोसले यांच्या गोठ्यातून ६० हजार रुपये किमतीच्या ५ बोकडांची चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.