Fri, March 31, 2023

सणसर येथे अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू
सणसर येथे अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू
Published on : 14 February 2023, 3:04 am
वालचंदनगर, ता. १४ ः सणसर (ता. इंदापूर) जवळ बारामती-इंदापूर रस्त्यावर सायकलस्वारास ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये सायकलस्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
अपघातामध्ये तुकाराम विनायक चव्हाण (वय- ५०, रा. सणसर) यांचा मृत्यू झाला. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार (ता. १२) रोजी सकाळी अकराच्या सुमारास चव्हाण हे बारामती- इंदापूर रस्त्याने बेलवाडी बाजूकडून सणसरकडे सायकलवरुन घरी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला. अपघातामध्ये चव्हाण यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोपट विनायक चव्हाण (रा. सणसर) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी नवनाथ सोपान कदम (रा. पुणे) या ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.