बोगस नोंदी रद्द करण्यासाठी अंथुर्णे येथे उपोषण आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस नोंदी रद्द करण्यासाठी
अंथुर्णे येथे उपोषण आंदोलन
बोगस नोंदी रद्द करण्यासाठी अंथुर्णे येथे उपोषण आंदोलन

बोगस नोंदी रद्द करण्यासाठी अंथुर्णे येथे उपोषण आंदोलन

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १५ : अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीने गायरान जागेमध्ये केलेल्या बोगस नोंदी रद्द करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या शीतल साबळे याने बेमुदत उपोषणास सुरवात केली असून, बुधवारी (ता. १५) उपोषणाचा तिसरा दिवस होता.
अंथुर्णे येथे इंदापूर-बारामती रस्त्याच्या बाजूला गायरान जमिनी आहेत. ग्रामपंचायतीने सदर जमिनी काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावे बांधकाम न करताच अवैधरीत्या नोंदी लावल्याचा आरोप भाजपच्या सामाजिक कार्यकर्त्या शीतल साबळे यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी व बोगस नोंदी रद्द करण्यासाठी त्यांनी सोमवारपासून (ता. १३) उपोषण सुरु केले आहे.
यासंदर्भात सरपंच लालासाहेब खरात यांच्याशी संपक साधला असता त्यांनी सांगितले की, सदरचा विषय १० ते १२ वर्षांपूर्वीचा असून, वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून योग्य तो निर्णय घेणार आहे.