काटेवाडीमध्ये दोन मजली इमारत सरकवली १० फूट मागे

काटेवाडीमध्ये दोन मजली इमारत सरकवली १० फूट मागे

वालचंदनगर ता. १० : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या रस्त्याच्या कामामध्ये आडवी येणारी तीन हजार चौरस फुटाची दोन मजली इमारत मूळ जागेपासून २०० जॅक व चॅनेलच्या साह्याने १० फूट मागे सरकविण्यामध्ये यश आले. यामुळे मुलाणी कुटुंबाला नवीन इमारत बांधण्यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये सुमारे २५ लाख रुपयांची बचत झाली.
इंदापूर, बारामती तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. महामार्गामध्ये आडव्या येणाऱ्या हजारो इमारती जमीनदो कराव्या लागल्या. याची नुकसान भरपाई संबंधितांना मिळाली. दरम्यान, काटेवाडी गावाजवळील मासाळवस्ती येथील मुलाणी कुटुंबाची तीन हजार चौरस फुटाची दोन मजली इमारतीचा सुमारे ९ फुटाचा पुढील भाग पाडावा लागणार होता. मात्र अकबर मुलाणी व हसन मुलाणी बंधूनी वडील दादासाहब मुलाणी यांच्या स्मृती जपण्यासाठी संपूर्ण इमारतच मागे सरकवण्याचा निर्णय घेतला.
गेल्या ३४ दिवसापासून इमारत ५ फूट उंच उचलून १० फूट पाठीमागे सरकवण्याचे काम सुरु आहे. दोन मजली इमारतीसाठी २०० जॅक व चॅनेलच्या साह्याने पाठीमागे सरकवली असून ४ फुटापर्यंत उंच उचलली आहे. याचे काम पानिपतमधील मोहनलाल ठेकेदाराने पूर्ण केले असून पुणे जिल्ह्यामध्ये इमारत सरकवण्याचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे.

अशी सरकवली इमारत
इमारत दोन मजली असून तीन हजार चौरस फुटाची आहे. सुरवातीला इमारतीचा पाया खोदून सिमेंट काँक्रिटीकरणाचे बीम जमिनीपासून जॅकच्या साह्याने तीन फुटापर्यंत वर उचलले. त्यानंतर रेल्वेच्या रुळासारखे चॅनेलचे रूळ तयार करून त्याच्यावर गोल लोखंडी बार ठेवून पुढील बाजूने जॅकच्या साह्याने प्रेशर देत हळूहळू इमारत १० फूट पाठीमागे सरकविण्यात आली.

२५ लाख रुपयांची बचत.
सध्याच्या काळामध्ये तीन हजार चौरस फुटाची इमारत बांधण्यासाठी ४५ ते ५० लाख रुपयांचा खर्च येत आहे. मुलाणी कुटुंबालाही इमारत पाडून नव्याने बांधण्यासाठी एवढा खर्च करावा लागणार होता. मात्र त्यांनी २० लाख रुपयांमध्ये इमारत पाठीमागे सरकवून वडिलांच्या आठवणही जपल्या असून खर्चामध्ये सुमारे २५ ते ३० लाख रुपयांची बचत केली.


शिल्लक जागेमुळे शक्य
मुलाणी यांची रस्त्यालगतची सुमारे ९ फूट जागा पालखी महामार्गामध्ये गेली असून त्यांना इमारत ही पाडावी लागणार होती. मात्र त्यांची पाठीमागे १० ते १२ फूट रिकामी जागा शिल्लक असल्यामुळे त्यांना इमारत मागे सरकवता आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com