''छत्रपती''च्या अंतिम मतदारयादीकडे जिल्हाचे लक्ष

''छत्रपती''च्या अंतिम मतदारयादीकडे जिल्हाचे लक्ष

वालचंदनगर, ता. २६ : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकतींची सुनावणी सुरू आहे. अंतिम मतदार यादीमध्ये किती सभासदांचा समावेश होणार याकडे बारामती, इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्हाचे लक्ष लागले आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या विचाराचे संचालक मंडळ कार्यरत आहे. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. मूळ मतदार यादीमध्ये २९९०४ सभासदांचा समावेश होता. या यादीमधून ४२६६ मयत सभासद, २४८ अज्ञान पालककर्ता असलेले सभासद व २४०० थकबाकीदार सभासद असून सर्वांची प्रारूप मतदार यादी १२ जुलै रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यास २० जुलै र्यंत हरकती घेण्यासाठी मुदत होती. यादीवर ५९५ हरकती आल्या असून कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सतीश काटे, विशाल निंबाळकर यांच्यासह अन्य सभासदांच्या हरकतींचा समावेश आहे. हरकतीवर सुनावणी २८ जुलैपर्यंत सुरू राहणार असून, दोन ऑगस्ट रोजी अंतिम मतदार प्रसिद्ध होणार आहे. अंतिम मतदार यादीवर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची दिशा ठरणार असून अंतिम मतदार यादीमध्ये किती सभासदांचा समावेश याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
--
विरोधक सभासदांचा हक्कच हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या मतदार यादीवर सुरू असलेल्या सुनावण्यांचा परिणाम दीर्घकाळासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सभासदांना त्यांच्या हक्कापासून थेट डावलण्याचा प्रकार सुरू आहे. कारखान्याचे संचालक मंडळ सभासदांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून सर्व सभासदांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com