निंबाळकर, पांढरे यांची इंदापूर अर्बन बॅंकेच्या संचालकपदी निवड

निंबाळकर, पांढरे यांची इंदापूर अर्बन बॅंकेच्या संचालकपदी निवड

वालचंदनगर, ता. ३१ : इंदापूर अर्बन बॅंकेच्या स्वीकृत संचालकपदी तालुक्याच्या पश्‍चिम भागातील तानाजी निंबाळकर व विजय पांढरे यांची निवड झाली.
इंदापूर अर्बन बॅंकेवर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे एकहाती वर्चस्व आहे. बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी देवराज जाधव व उपाध्यक्ष सत्यशील पाटील यांची निवड केली. पश्‍चिम भागातील काही पदाधिकारी बॅंकेच्या संचालक पदासाठी इच्छुक होते. सणसरमधील तानाजी ऊर्फ बाबा निंबाळकर व जांब मधील विजय पांढरे यांची स्वीकृत संचालकपदी निवड झाली असून दोघांना संचालकपद देण्यात आले.
निवडीनंतर निंबाळकर व पांढरे यांनी सांगितले की, ‘‘माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा, व्यावसायिकांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com