इंदापुरातील ज्वारी, मका पिकास अवकाळीमुळे जीवदान

इंदापुरातील ज्वारी, मका पिकास अवकाळीमुळे जीवदान

वालचंदनगर, ता. ६ : अवकाळी पावसाचा इंदापूर तालुक्यातील चार हजार ३०० हेक्टर ज्वारी व सात हजार हेक्टरवरील मका पिकाच्या क्षेत्राला फायदा झाला आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यामध्ये चालू वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी ही घटली आहे. यंदा वर्षी एक जून ते ३० ऑक्टोबरपर्यंत ३४४.८ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा ३३ टक्के पाऊस कमी आहे. तालुक्यामध्ये ज्वारीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली असून, २६०० हेक्टरवरुन वाढ होऊन ४३०० हेक्टरपर्यंत ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. सुमारे अडीच ते तीन महिन्यांपासून पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळाले आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वीच रब्बीच्या हंगामातील पेरणी केलेल्या ज्वारी व मकेच्या पिकांना पाण्याची गरज होती. दरम्यान, २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून ३५ ते ४५ मिलिमिटर पाऊस पडला. या पावसाचा ज्वारी व मकेच्या पिकांना फायदा झाला आहे. यामुळे ज्वारीचे पीक तरारले आहे. ज्वारीचे पिकांना जीवदान मिळाले असून, काही शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फायदा झाला आहे. तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असून, ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना औषध फवारणी वाढवावी लागत आहे.


नीरा डाव्या कालव्याच्या रब्बीसाठी आवर्तन सुरू
नीरा डाव्या कालव्यातून रब्बीच्या हंगामातील पिकांसाठी १२ नोव्हेंबरपासून आवर्तनास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत नीरा डाव्या कालव्याच्या ५३ ते ५९ पर्यंतच्या वितरिकेवरील पिकांना पाणी देण्यात येत असून, ते अंतिम टप्प्यात आहे. येत्या चार-पाच दिवसामध्ये पश्‍चिम भागातील ५४ क्रमांकाच्या वितरिकेवरील शेतकऱ्यांना पाणी देण्यात येईल.


गेल्या आठवड्यामध्ये आमचे ज्वारीचे पीक पाण्यासाठी आले होते. अवकाळी पावसामुळे ज्वारीच्या पिकांना पाणी मिळाले असून, ज्वारी तरारली आहे. अवकाळीमुळे उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होईल, निमसाखरमधील शेतकरी हरिश्‍चंद्र अप्पासाहेब रणवरे व बाळासाहेब रणवरे यांनी सांगितले.


03866

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com