‘एमपीएससी’च्या परीक्षेत 
इंदापूर तालुक्याचा षटकार

‘एमपीएससी’च्या परीक्षेत इंदापूर तालुक्याचा षटकार

वालचंदनगर, ता. ६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये इंदापूर तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. त्यामुळे इंदापूरचे नाव राज्यामध्ये झळकले.
या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये इंदापूर तालुक्यातील पळसदेवमधील ऋतुजा काळे व कडबनवाडीमधील ऋतुजा पवार यांची मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारीपदी निवड झाली. तर, काटी गावातील दत्तात्रेय पाटील याची सहकार अधिकारीपदी निवड झाली. गिरवीमधील अमर जगताप याची सहायक सहकार ऑफिसरपदी निवड झाली असून, टण्णू येथील रावसाहेब जाधव व लासुर्णे जवळील गायत्री चव्हाण यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. तसेच, पळसदेवमधील सागर केवटे याची महाराष्ट्र परिवहन मंडळामध्ये सरळ सेवा भरतीमधून सहायकपदी निवड झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेची गोडी लागली आहे. अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण सुरु असताना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करीत आहेत. तसेच, सन २०२३ मध्ये झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेमध्ये इंदापूर तालुक्यातील शंभरपेक्षा अधिक मुले-मुली पोलिस भरती झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com