इंदापूरच्या पाणी प्रश्‍नाबाबत 
अधिवेशनामध्ये लक्ष्यवेधी

इंदापूरच्या पाणी प्रश्‍नाबाबत अधिवेशनामध्ये लक्ष्यवेधी

Published on

वालचंदनगर, ता. ४ : इंदापूर तालुक्यातील सणसर कटमधून तालुक्यातील शेतकऱ्यांना ३.९ टीएमसी पाणी मिळत होते. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षामध्ये एकही थेंब पाणी आले नाही. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सांगून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनामध्ये आमदार भरणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्‍न मांडला. त्यांनी सांगितले की, खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला पिण्यासाठी जादा पाणी दिले जात आहे. याचा सर्वाधिक परिणाम या प्रकल्पातून शेती सिंचनासाठी काढण्यात आलेल्या उजवा खडकवासला कालव्याद्वारे सिंचित होत असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनावरती होत आहे. पूर्वी खडकवासला धरणाचे सणसर कटमधून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ३.९ टीएमसी पाणी मिळत होते. मात्र, गेल्या दहा- बारा वर्षात एक थेंबही पाणी मिळाले नाही. तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय होत असून, शेतकऱ्यांचा विचार व्हावा.
यासंदर्भात सुर्वे समितीचा अहवालाविषयी माहिती देऊन इंदापूर, बारामती, दौंड, हवेली तालुक्याच्या लोकप्रतिनिधींची एकत्र बैठक कधी होणार असल्याचे भरणे यांनी विचारले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सुर्वे कमिटीचा अहवाल प्राप्त झाला असून, लवादाच्या अटी व शर्थीनुसार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच, इंदापूर, बारामती, दौंड, हवेली तालुक्यातील लोकप्रतिनिधींचीही लवकरच बैठक घेणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.