निमसाखर येथे वारकऱ्यांना अल्पोपाहार

निमसाखर येथे वारकऱ्यांना अल्पोपाहार

Published on

वालचंदनगर, ता. ११ निमसाखर (ता.इंदापूर) येथील मॉर्डन इंजिनिअरिंग ग्रुपच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून बीकेबीएन रस्त्याने जाणाऱ्या पालखीमधील वारकऱ्यांना अल्पोपाहाराचे वाटप करण्यात येते. यंदा संत सोपानकाका, योगीराज संतराज यांच्यासह अन्य पालखी सोहळ्यातील पाच हजार वारकऱ्यांना अल्पोपाहार व दहा हजार वारकऱ्यांना चहाचे वाटप करण्यात आले.

बीकेबीएन रस्त्याने अनेक संतांच्या पालख्या गुरुवारी (ता.११) पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. पालख्यांमुळे बीकेबीएनचा रस्ता वारकऱ्यांनी फुलला. निमसाखरमधील भगवानराव रणसिंग, संतोष रणसिंग, विनोद रणसिंग हे गेल्या दहा वर्षांपासून मॉर्डन इंजिनिअरिंग ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना नाष्ट्याचे वाटप करीत आहेत. रणसिंग कुटुंबाची वारकऱ्यांची मनोभावे सेवा करण्यासाठी धावपळ सुरू होती. ते रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांना बोलावून अल्पोपाहार देण्यात दंग झाले होते.

04404

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.