पुणे
जंक्शनमध्ये आज हंकारे यांचे व्याख्यान
वालचंदनगर, ता. १३ : जंक्शन (ता. इंदापूर) येथील नंदिकेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये उद्योजक व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. १४) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी समाज परिवर्तनकार वसंत हंकारे यांचे ‘बाप समजून घेताना’ या विषयावर होणार आहे, अशी माहिती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती रोहित मोहोळकर यांनी दिली.
तसेच विद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण व लासुर्णे येथील आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे. हंकारे यांच्या व्याख्यानामुळे मुले व मुलांमध्ये परिवर्तन होत असल्याने परिसरातील नागरिकांनी व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मोहोळकर यांनी केले आहे.