लासुर्णे येथे पशुपालकांची सुविधांअभावी गैरसोय
राजकुमार थोरात : सकाळ वृत्तसेवा
वालचंदनगर, ता.३० : लासुर्णे (ता.इंदापूर) पशुचिकित्सालस नव्या सुसज्ज इमारतीची तसेच अत्याधुनिक सुविधांची गरज आहे. इंदापूर गावामध्ये श्रेणी -१ पशुचिकित्सालय आहे. मात्र येथील इमारत जुनी आहे. इमारतीला संरक्षक भिंत नाही. तसेच परिसरात जनावरांची संख्या जास्त असल्यामुळे एक्सरे, सोनोग्राफी सारख्या सुविधांची गरज आहे. सुविधांच्या वानवांमुळे पशुपालकांची गैरसोय होत आहे.
दवाखान्यात रुग्णवाहिकेची सुरवात झाली असून शेतकऱ्यांना सुविधा देण्यात येत असल्याचे पशुधन विकासअधिकारी आहे. वैरण विकास योजनेसाठी तालुक्यातून १५० अर्ज आले आहेत. त्यांना मका, शुगर गेल, कडवळ, ज्वारीच्या बियाणे देण्यात येणार आहे, असे दवाखान्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्षेत्रातील गाव
लासुर्णे
अंथुर्णे
जंक्शन
आनंदनगर
बोरी
यांची आहे गरज...
पशुचिकित्सालय साठी सुसज्ज इमारत
एक्सरे सुविधा
सोनोग्राफी सुविधा
रक्त लघवी सुविधा
परिसरातील पशुधन
गाय वर्ग ...........५६७३
शेळ्या...........५४९०
मेंढ्या...........१८९५
म्हैसवर्ग...........१७९४
लसीकरण...
लाळ्या खुरकूत...........८२७०
पीपीआर (शेळ्या मेंढ्याना)...........७५००
लंपी...........६४००
आंत्रविषार...........२८००
फऱ्या...........३५०
घटसर्प...........३००
जनावरांच्या झालेल्या शस्त्रक्रिया.
लहान शस्त्रक्रिया...........११३
मोठी शस्त्रक्रिया...........१२
परिसरातील प्रमुख रोग
लाळ्या खुरकूत
लंपी
पीपीआर
आंत्रविषार
लासुर्णे पशुचिकित्सालय याच्या परिसरामध्ये दररोज सरासरी २५ शेतकऱ्यांच्या गोठ्यावर भेटी देऊन जनावरांवरही उपचार करण्यात येत आहेत. सध्या जनावरांना प्रामुख्याने गोचीड ताप, स्तनदाह, हगवण, ताप येणे, पचनक्रिया बिघडण्याचे आजार आहेत. जनावरांवर योग्य उपचार केले जातात.
- डॉ. पी.एम.तरंगे, पशुधनविकास अधिकारी, लासुर्णे
05661
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

