‘छत्रपती’च्या संचालकांचा पालखी मार्गास विरोध
राजकुमार थोरात : सकाळ वृत्तसेवा
वालचंदनगर, ता. ४ : भवानीनगर (ता.इंदापूर) येथे श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सध्या रखडले आहे. येथील पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर कारखान्याचा परिसर दोन भागामध्ये विभागला जाणार आहे. कारखान्याच्या उसाचे ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाडी लावण्याची जागा एका बाजूला व दुसऱ्या बाजूला कारखाना राहणार आहे. पूल झाल्यानंतर उसाची भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली कारखान्याच्या यार्डमध्ये येण्यास अडचण होणार असल्यामुळे सध्याच्या विद्यमान संचालक मंडळाने पालखी महामार्गाला विरोध केला आहे.
भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी सार कारखाना संत तुकाराम महाराज पालखी महामार्गलगत आहे. तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळामध्ये पालखी महामार्गाचे काम सुरू झाले होते. कारखान्यासमोर पालखी महामार्गावर उड्डानपूल करण्याचे नियोजन असून, त्यासाठी खांब ही उभे केले आहेत. भविष्यातील समस्येमुळे पालखी महामार्गासाठी बाय-पासचा विचार करण्याची मागणी संचालक मंडळाने केली आहे.
जनआंदोलन उभारण्याचा इशारा
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, भवानीनगर, लासुर्णे-सणसर-जंक्शन परिसरामध्ये पालखी महामार्गाचे काम चुकीचे झाले आहे. या महामार्गाला नागरिकांचा विरोध असून जनआंदोलन उभारण्यात येईल. तसेच भवानीनगरमध्ये उसाने भरलेल्या ट्रॅक्टर -ट्रॉलीची उंची पुलापेक्षा जास्त होत असल्यामुळे ट्रॅक्टर -ट्रॉलीची येण्यास अडचणी निर्माण होईल. याचा परिणाम वाहतुकीवर होणार असून दररोज वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. कारखान्याच्या पुढील बाजूचा उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली असून महामार्गाचे काम रद्द न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा जाचक यांनी दिला आहे.
३५० वर्षांची पंरपरा मोडली जाणार परंपरा
सणसरमध्ये पालखी तळाजवळ ये-जा करण्यासाठी भुयारीमार्ग ठेवला नसल्यामुळे संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा गावामध्ये मुक्कामी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंढरपूरकडे मार्गस्थ होताना पालखी सोहळ्याला उलट्या बाजूने भवानीनगरकडे बाजूकडे जावे लागणार आहे. सणसर गावाच्या बाहेरून पुन्हा पंढरपूरकडे जावे लागणार आहे. पालखी सोहळ्याला उलटा प्रवास करावा लागणार असल्यामुळे लाखो वैष्णावांची गैरसोय होणार असून ३५० वर्षाची पंरपरा मोडली जाणार असल्याचे श्री छत्रपती कारखान्याचे संचालक व सणसरचे ग्रामस्थ शिवाजीराव निंबाळकर यांनी सांगितले.
05669
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

