सुकलवाडीमध्ये ''सावित्री उत्सव'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुकलवाडीमध्ये ''सावित्री उत्सव''
सुकलवाडीमध्ये ''सावित्री उत्सव''

सुकलवाडीमध्ये ''सावित्री उत्सव''

sakal_logo
By

वाल्हे, ता. ५ : सुकलवाडी (ता. पुरंदर) येथे जागृती फाउंडेशन, भोलाई महिला ग्रामसंघ आणि आम्ही संवादी (आस) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ''सावित्री उत्सव'' साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुहिक सावित्रीबाईंची ओवी गाण्यात आली. तदनंतर महिलांनी ''सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि आपल्या आयुष्यात त्यामुळे झालेला उपयोग'' या विषयावर सुप्रिया पवार, वनिता पवार, जयश्री पवार, रूपाली
पवार, नम्रता पवार, अमृता चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सोनाली यादव, माजी सरपंच सुवर्णा चव्हाण यांची भाषणे झाली.


दरम्यान, जागृती फाउंडेशन आणि आम्ही संवादीचे कार्याध्यक्ष श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी ''सावित्रीबाई यांच्या विचारांची आजच्या काळात गरज'' या विषयांवर संवाद साधला. यावेळी प्रत्येक महिलेला ''ज्ञानाच्या दिव्या''चे प्रतीक म्हणून एक दिवा भेट देण्यात आला.

यावेळी सुकलवाडीचे सामाजिक कार्यकर्ते राहुल यादव, विठ्ठल पवार, रवींद्र भोसले, राजेंद्र चव्हाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शर्मिला पवार, उपसरपंच संतोष पवार, धनंजय पवार, सारिका भोसले यांनी विशेष योगदान दिले.
राहुल यादव यांनी प्रास्ताविक केले, तर धनंजय पवार यांनी आभार मानले.
...