Sun, April 2, 2023

शिंदे गट समर्थकांचा
वाल्हे येथे जल्लोष
शिंदे गट समर्थकांचा वाल्हे येथे जल्लोष
Published on : 17 February 2023, 3:43 am
वाल्हे, ता. १७ : निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव दिल्यानंतर वाल्हे (ता. पुरंदर) येथे शिंदे गट समर्थक व भाजपच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवत गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. यावेळी
मुख्य बाजारपेठमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा केला. याप्रसंगी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन लंबाते, राहुल यादव, समदास राऊत, सचिन देशपांडे, विनोद पवार, सचिन दोशी, मनोज घाटे, अमित पवार, रोहित भोसले आदी उपस्थित होते.