सुवर्णा भुजबळ ठरल्या पैठणीच्या मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुवर्णा भुजबळ ठरल्या पैठणीच्या मानकरी
सुवर्णा भुजबळ ठरल्या पैठणीच्या मानकरी

सुवर्णा भुजबळ ठरल्या पैठणीच्या मानकरी

sakal_logo
By

वाल्हे, ता.१५ : वाल्हे (ता.पुरंदर) गावच्या चैत्री उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ''खेळ पैठणीचा'' या स्पर्धेत उखाणे, डान्स आदींमुळे आंनद सोहळा खऱ्या अर्थाने रंगला. यात सुवर्णा गणेश भुजबळ यांनी बाजी मारत पैठणीचा मान पटकावला. स्पर्धेचे दोन विजेते, पंचेचाळीस उपविजेते ठरले. या स्पर्धेत शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला.
खेळामध्ये पूजा सागर चव्हाण (द्वितीय), सुनीता लक्ष्मण पवार (तृतीय) पटकावला. तर उर्वरित सहभागी महिलांना देखील आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला चैत्री उत्सवानिमित्त ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने खास महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळे यात्रेमध्ये घरकामात राबणारे महिलांचे हात आज ''खेळ पैठणीचा'' खेळण्यात रंगले होते.
महिलांच्या श्रमपरिहार व्हावा आणि त्यांना देखील यात्रेचा आनंद लुटता यावा. यासाठी यात्रा कमिटीने ''खेळ पैठणीचा'' हा विशेष कार्यक्रम आयोजित केले होते. यासाठी शेकडो वाल्हेकर महिलांनी घरच्या कामांना बगल देत किंवा वेळे आधीच कामे पूर्ण केली व पैठणीच्या खेळाला उपस्थिती लावली होती. यावेळी गाणी, उखाणे, फुगे फोडणे, चेंडू फेकणे विविध खेळांमध्ये शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाची उडालेली धांदल अन्‌ उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा ठरला. सूत्रसंचालक अनिल गोंदकर यांच्या विनोदाने भरलेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक हसून हसून लोटपोट झाले.
यावेळी प्रवीण कुमठेकर, हनुमंत पवार, प्रशांत पवार, सूर्यकांत भुजबळ, डी.डी.पवार आदींच्या हस्ते विजेत्या महिलांना पैठणी देऊन सन्मान
करण्यात आला.

गेल्या अनेक पूर्वापार मंदिरात देवाच्या हळद व लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर महिलांचा बाकी सर्व वेळ पाहुण्याचे स्वागत खाणे-पिणे व स्वच्छता यामध्ये व्यथित होत होता. मात्र, देवस्थान ट्रस्टने सर्वच महिलांच्या मनातील मळभ दूर करत यात्रेचा खरा आनंद घेण्यास वेळ उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे.
- सुवर्णा भुजबळ, पैठणीच्या विजेत्या

01345