वाल्हे येथे माउलींच्या पाखलीवर पुष्पवृष्टी

वाल्हे येथे माउलींच्या पाखलीवर पुष्पवृष्टी

Published on

वाल्हे, ता.८ : ''पंढरीहून गावी जाता वाटे खंती पंढरीनाथा, आता बोळवित यावे आमच्या गावा आम्हा सवे,'' असा मुखी पांडुरंगाचा गजर करीत हातामध्ये
टाळमृदुंग वाजवित निघालेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आद्य रामायणकार महर्षि वाल्मीकी ऋषींच्या वाल्हेनगरीत आगमन झाले.
आगमनानंतर फुलांची पुष्पवृष्टी करत भक्तिमय वातावरणात ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिकांच्या भावपूर्ण स्वागताने भारावलेला पालखी सोहळा महर्षि
वाल्मीकी विद्यालयाच्या प्रांगणात मुक्कामासाठी विसावला.
सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश करीत नीरा गावची हद्द ओलांडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने सायंकाळी साडेचार वाजता वाल्हे गावच्या वेशीवर प्रवेश केला. मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी वाल्हेचे सरपंच अमोल खवले, हनुमंत पवार, ग्रामसेवक राजाराम शेंडगे, दत्तात्रेय पवार, सुनील पवार, प्रा.संतोष नवले, देविदास भोसले, मंडल अधिकारी भारत भिसे, तलाठी नीलेश अवसरमोल, दादासाहेब मदने, माणिक महाराज पवार, त्रिंबक भुजबळ, सुधाकर पवार आदींनी पालखीचे स्वागत केले.
नीरा येथील विश्रांतीनंतर पालखी सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला. ऊन-सावलीच्या खेळात मार्गक्रमण करीत सायंकाळी पाच वाजता विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी माऊलींच्या रथामधून पालखी खांद्यावर घेत गगनभेदी माऊली-माऊली चा जयघोष केला. महर्षी वाल्मीकी विद्यालयाच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा रांगोळीच्या पायघड्या अंथरूण फुलांची पुष्पवृष्टी करत पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, विद्यालयाचे प्राचार्य अब्दुल गफारखान पठाण, बाबासाहेब कुंभार आदींसह विद्यालयातील सर्व शिक्षण उपस्थित होते. स्वागतानंतर सव्वापाच वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा महर्षि वाल्मीकी विद्यालयातील प्रांगणामध्ये मुक्कामासाठी विसावला.
तद्‌नंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत समाजआरती झाली. मांडके कुटुंबीयांच्या वतीने माऊलींच्या पादुकांना विधीवत पूजा अर्चा करण्यात आली. वाल्हे
पोलिस औटपोस्टचे घनशाम चव्हाण व प्रशांत पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पालखी सोहळ्याचे योगेश देसाई, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार आदींचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.


01755

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.