वाल्हे येथे संदल मिरवणुकीने उरसाला सुरवात

वाल्हे येथे संदल मिरवणुकीने उरसाला सुरवात

वाल्हे, ता. १० : वाल्हे (ता. पुरंदर) येथील हिंदू-मुस्लिम एक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत पीर दावल मलिक पीर दर्गा शरीफ दोन दिवसीय उरसाची संदल मिरवणुकीने सुरवात झाली. यानंतर समाजामध्ये शांतता रहावी याकरिता प्रार्थना करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदा हजरत पीर दावल मलिकांच्या उरसानिमित्त शनिवारी सायंकाळी संदल मिरवणुकीस सुरवात झाली. संदलमध्ये ढोल-ताशा, बॅड पथकांनी वाल्हे दणाणून गेले. बारामती येथील बँड पथकाने विविध गाणी वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मिरवणूक
पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. याप्रसंगी चाँदभाई शेख, आरिफ तांबोळी, आरिफ तांबोळी, रमझान आतार, लाला आतार, अब्दुल तांबोळी, जहाँगीर
तांबोळी, अस्लम शेख, शौकत तांबोळी आदी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
दातेवाडी फाट्यानजीक हजरत पीर दावल मलिक पीर दर्गा शरीफ सर्वदूर प्रसिद्ध आहे. बाहेरगावावरून भाविक या ठिकाणी दरवर्षी दर्शनासाठी हजेरी लावतात. दर्गाला कबूल केलेला नवस पूर्ण होतोच, असा विश्वास भक्तांना असतो. त्यामुळे नवस पूर्ण होणारे भक्त या ठिकाणी विविध धार्मिक
कार्यक्रमांसह महाप्रसादाचेही वाटप करतात. या वेळी मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने दर्गाला चादर पेश करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी समाजामध्ये शांतता राहावी याकरिता प्रार्थना करण्यात आल्याचे खुदबुद्दीन तांबोळी यांनी सांगितले.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com