वागदरवाडीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात

वागदरवाडीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात

वाल्हे, ता. २४ : वागदरवाडी (ता. पुरंदर) येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व देवी जोगेश्वरी चैत्रोत्सव व हनुमान जयंती उत्साहात पार पडली. हनुमान जन्मोत्सवानंतर श्रींच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा झाली. वागदरवाडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ व देवी जोगेश्वरी यांची यात्रा तसेच हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी सूर्योदयापूर्वी हनुमान जन्मोत्सव झाला. बजरंग बली की जय, पवनसूत हनुमान की जय च्या गजरात हनुमान मूर्तीवर पुष्पवृष्टी करत हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. महिलावर्गाने मारुती जन्माचे पाळणे सादर केले.

यावेळी हनुमानाला रुईच्या पाना-फुलांच्या माळा, शेंदूर, तेल व नारळ अर्पण करून दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तत्पूर्वी मंत्रपठण झाल्यानंतर हनुमानाची भक्तिगीते गायली. जन्मोत्सवानंतर ग्रामदैवत श्री भैरवनाथ व देवी जोगेश्वरी यांच्या मूर्तींना शाही पोशाख आणि पुष्पहार घालून सजविलेल्या पालखीतून गावांतर्गत सवाद्य मिरवणुक काढली. यावेळी मिरवणुकमार्गावर दुतर्फा रांगोळी काढली होती. ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या पालखीची गावांतर्गत ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणुक काढली. यावेळी पालखीचे व काठ्यांचे मानकरी, उत्सव कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ, महिला तरुणवर्ग मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सामील झाले होते.

यावेळी ‘नाथ साहेबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात गुलालाच्या उधळणीत परिसर भक्तिमय होऊन गेला होता. मिरवणुकीदरम्यान ग्रामपंचायत सदस्या विजया पवार, पल्लवी कदम, राधिका बर्गे, सोनल शिंदे, आशा पवार आदींनी फुगड्या खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. ‘नाथ साहेबाचं चांगभलं’ म्हणत फटाक्यांची आतषबाजी, गुलाल खोबऱ्याचा सडा आणि पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात तब्बल तीन तास चाललेली मिरवणुक मुळ ठिकाणी विसावल्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरती केली. यावेळी पोपट पवार, उपसरपंच सचिन पवार, कांतिलाल भुजबळ, मधुकर पवार, अजित शिंदे, सुनील अंकुश पवार, दीपक पवार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांना महाप्रसादाच्या वाटपानंतर श्री भैरवनाथाच्या चैत्री उत्सवाची सांगता झाली.
दरम्यान यावेळी येथील तरुणांच्या साथमैत्री व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून गावांतर्गत आकर्षक विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com