क्रॉप कव्हरमुळे मिळते डाळिंब बागेला संरक्षण

क्रॉप कव्हरमुळे मिळते डाळिंब बागेला संरक्षण

वाल्हे, ता. २५ : वाल्हे (ता.पुरंदर) जवळील मुकदमवाडी येथील प्रयोगशील शेतकरी नितीनकुमार पवार यांनी दीड एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे. काढणीच्या काळात वाढत असलेली उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून संपूर्ण बागेला नेटचे (क्रॉप कव्हर) आच्छादन दिले. या कव्हरच्या प्रयोगामुळे फळांचे उष्णता व विविध रोगांपासून संरक्षण होते. संपूर्ण बाग पांढरी शुभ्र दिसत आहे.
पवार यांनी विविध कीटक व बुरशीनाशकाची वेळोवेळी फवारणी केली जात आहे. मात्र, सध्या उन्हाचा पारा प्रचंड वाढला असून डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला डाळिंब फळास उन्हाचे चटके बसून डाग पडण्याची भीती वाटत आहे. फळ कितीही मोठे झाले पण त्यावर जर उन्हामुळे डाग आला तर किंमत मातीमोल मिळते. त्यामुळे डाळिंब फळाचे उन्हापासून संरक्षण करणे महत्त्वाचे झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी नायलॉनचे कापड खरेदी केले असून हे कापड संपूर्ण बागेवर झाडाच्यावर बांधून त्याला बांबूने आधार दिला आहे.


नेटमुळे असा होता फायदा
फळांचा आणि आतील दाण्यांचा रंग
आकार, गुणवत्ता, चव वाढते
रसाच्या प्रमाणात होते सुधारणा

यापासून होतो बचाव
*करपा * बुरशी * तेल्या * मररोग

सध्यस्थितीला पाण्याच्या कमतरतेमुळे विकतचे पाणी घेऊन बाग वाचवावी लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होते. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी उपलब्तेनुसार विविध क्लृप्त्या लढवून जुन्या साड्या, कापडाचा वापर करतात किंवा नेटच्या सहाय्याने डाळिंब बागेला आच्छादन देऊन फळबागा वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च येत आहे. योग्य बाजारभाव मिळाल्यास उत्पादन खर्च वसूल होईल.
- नितीनकुमार पवार, डाळिंब उत्पादक

02932

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com