वाल्हे येथे रेल्वेच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

वाल्हे येथे रेल्वेच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

Published on

वाल्हे, ता.६ : वाल्हे (ता.पुरंदर) येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता.६) मुक्कामी विसावला होता. मात्र शनिवारी (ता.७) मध्यरात्री मुंबई-कोल्हापूर एक्स्प्रेसने दोन वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेल्वे पोलिस हवालदार मुकुंद साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वारकरी वाल्हे पोलिस दुरक्षेत्रापाठीमागील बाजूला लोहमार्ग पार करत असताना किंवा इतर काही कारणास्तव लोहमार्गावरून जात होते. त्यावेळी मुंबई-कोल्हापूर एक्स्प्रेसची वारकऱ्यांना धडक बसली. दरम्यान, अपघातानंतर एक्स्प्रेस चालकाने घडलेल्या घटनेची माहिती वाल्हे रेल्वे
स्थानकाला दिली. अपघाताबाबत माहिती मिळताच जेजुरी रेल्वे पोलिसांना घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान, अपघातामधील एक वारकरी एक हात मोडल्याचे व एक पाय तुटून बाजूला पडून जागीच गतप्राण झाला होता तर दुसरा वारकरी जखमी अवस्थेत आढळला. त्यास त्वरित उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी रेल्वे पोलिस अशोककुमार धनखड, वाल्हे पोलिस दुरक्षेत्राचे प्रशांत पवार, अमोल भुजबळ, मंगेश दाते आदी उपस्थित होते. दरम्यान, दोन्ही वारकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सापडले नसल्याने त्यांची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.