वाल्हे गावाच्या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर

वाल्हे गावाच्या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर

Published on

वाल्हे, ता. ११ : वाल्हे (ता. पुरंदर) येथे पुणे- पंढरपूर पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे गावाचा जुना मुख्य रस्ता बंद केला आहे. त्यामुळे आता गावातून जेजुरी अथवा नीरा या मार्गांवर जाण्यासाठी जास्त अंतरावरून फेरा मारावा लागत आहे. परिणामी ग्रामस्थांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
महामार्गाच्या कामात येणारी गावाची सार्वजनिक पाणीपुरवठा टाकी येत्या २- ३ दिवसांत पाडण्यात येणार असल्याचे समजते. मात्र, ही टाकी पाडण्याआधी टाकीशेजारील जुना रस्ता अगोदर पूर्ववत करावा, अन्यथा ही टाकी पाडण्यास विरोध करू, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.
त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. ११) टी अॅंड टी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सुवर्णसिंग वाघ, फारुक सय्यद, राजेंद्र ढगे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन लंबाते, सरपंच अतुल गायकवाड, माजी सरपंच अमोल खवले, माजी सभापती गिरीश पवार, सागर भुजबळ, अभिजित पवार, अमित पवार, सुधाकर पवार, सचिन दोशी, राजेंद्र ढवळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सार्वजनिक पाणीपुरवठा टाकी पाडण्याचा निर्णय टाकीशेजारील रस्ता पूर्ववत केल्यावरच घ्यावा, हा मुद्दा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्या संदर्भातची मागणी लंबाते यांसह ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे नमूद केली.
दरम्यान, ग्रामस्थांच्या सर्व मागण्या जाणून घेऊन वाघ यांनी वरिष्ठ पातळीवर पाठवून पर्यायी मार्ग तयार करण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाण्याबाबत आश्वासन दिले.

प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे
पुणे- पंढरपूर पालखी महामार्गाचे काम आवश्यक असले तरी त्यातून गावातील मूलभूत सुविधा आणि जनजीवन विस्कळित होणार असेल तर त्याला ग्रामस्थांचा विरोध राहणार हे आजच्या चर्चेतून स्पष्ट झाले. सार्वजनिक पाणीपुरवठा टाकी ही गावाच्या जीवनवाहिनीप्रमाणे आहे. तिच्या पाडकामाआधी टाकीशेजारील रस्ता पुर्ववत खुला करावा, ही मागणी रास्त असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

05230

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com