‘दुर्गाडे समाजकारणावर भर देणारे नेते’

‘दुर्गाडे समाजकारणावर भर देणारे नेते’

Published on

वाल्हे, ता.५ : ‘‘प्रा. दिगंबर दुर्गाडे यांचे नेतृत्व हे स्पष्ट विचारांचे, शांत पण प्रभावी निर्णयांचे आहे. राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देणारे नेते आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ते सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहतात. अशा नेतृत्वाची गरज तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे . हा विश्वास त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देईल,’’ असे मत पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी व्यक्त केले.

वाल्हे (ता.पुरंदर) येथे प्रा.दिगंबर दुर्गाडे मित्र परिवाराच्या वतीने पुणे जिल्हा बॅकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनाने केले होते. वाढदिवसानिमित्त प्रा.दुर्गाडे यांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक मान्यवरांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, प्रवीण शिंदे, बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिरूद्ध सरदेसाई, सरव्यवस्थापक संजय शितोळे, जालिंदर कामठे, विराज काकडे, सोमेश्वरचे संचालक अनंता तांबे, नीलेश जगताप, सचिन लंबाते, गणेश ढोरे, अतुल म्हस्के, पृथ्वीराज निगडे, संतोष निगडे, सागर भुजबळ, राहुल यादव, माऊली यादव आदींसह तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रा. दिगंबर दुर्गाडे यांना भविष्यात आमदार म्हणून पाहण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली.
सरपंच संदेश पवार, अशोक बरकडे, अमोल खवले, महादेव चव्हाण, सत्यवान सूर्यवंशी, सूर्यकांत पवार, गोरख कदम, जयवंत भुजबळ, तेजस दुर्गाडे, अभिषेक दुर्गाडे आदींसह प्रा. दिगंबर दुर्गाडे मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.
दरम्यान, सरपंच अतुल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुमठेकर, प्रा. संतोष नवले यांनी सूत्रसंचालन तर दत्तात्रेय पवार यांनी आभार मानले.

पूरग्रस्तांना मदतीचा हात
मराठवाडा परिसरात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत प्रा. दिगंबर दुर्गाडे मित्र परिवाराच्या वतीने मदतीचा हात पुढे केला आहे. मित्र परिवाराच्या वतीने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पशुधनासाठी मुरघास तसेच चारा पाठवणार आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊ वाटप करण्यात आले.

05382

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com