बाहेरचे लोकही ‘आडाचीवाडी मॉडेल’ अनुभवायला येतील
वाल्हे, ता. १८ : ‘‘रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीमुळे आडाचीवाडीचा विकास अधिक वेगाने पुढे सरकत आहे. गावकऱ्यांनी गटतट बाजूला ठेवून एकत्र येणे हीच या प्रगतीची सर्वात मोठी ताकद आहे. या शिबिराचे आयोजन व संपूर्ण नियोजन अत्यंत प्रभावीपणे पार पडले. लवकरच येथील झपाट्याने होत असलेला बदल पाहण्यासाठी बाहेरचे लोकही ‘आडाचीवाडी मॉडेल’ अनुभवायला येथे नक्की येतील,’’ असा विश्वास पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केला.
आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे मंगळवारी (ता. १८) महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर व महसूल सेवा पंधरवडा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. दुर्गाडे बोलत होते. या शिबिरात तहसील कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवा व विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के म्हणाले की, ‘‘आडाचीवाडीतील नागरिकांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अत्यंत कौतुकास्पद आहे. सर्व विभागांनी समन्वयातून उत्कृष्ट सेवा दिल्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.’’
याप्रसंगी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन लंबाते, वाल्ह्याचे सरपंच अतुल गायकवाड, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, शालिनी पवार, दत्ता चव्हाण, गिरीश पवार, समदास राऊत, नायब तहसीलदार संदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, अमित चंदन, विशाल जाधव, सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले, चंद्रकांत धायगुडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच मोहन पवार यांनी केले. तहसीलदार राजपूत यांनी प्रास्ताविक केले. मराठी अभिनेते विनोद शिंदे व प्रमोद झुरुंगे यांनी सूत्रसंचालन, तर गटविकास अधिकारी डॉ. प्रणोती श्रीश्रीमाळ यांनी आभार मानले.
शासनाच्या सर्व सेवा व योजनांचा लाभ थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले. विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. महाराजस्व समाधान शिबिर हा शासनाचा लोकाभिमुख उपक्रम असून, नागरिकांची कामे जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने करण्याचा यामागील उद्देश आहे.
- विक्रम राजपूत, तहसीलदार
05762, 05763, 05764
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

