पुणे
अज्ञात वाहनाच्या धडकेत नीरेत पादचाऱ्याचा मृत्यू
वाल्हे, ता. १८ : नीरा (ता. पुरंदर) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. १८) सकाळी घडली.
याबाबत गणेश शशिकांत काळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचे वडील शशिकांत मधुकर काळे हे मंगळवारी (ता. १८) सकाळी साधारण सहा ते सव्वासहाच्या दरम्यान नीरा बसस्थानकाजवळून जेजुरी रस्त्यावरील डाव्या बाजूच्या लेनजवळून पायी जात होते. त्यावेळी लोणंदकडून जेजुरीकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने बेफिकीरपणे व अतिवेगात येत पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात काळे यांना डोक्याला, पायाला व शरीरावर गंभीर दुखापती झाल्या. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक न थांबता पसार झाला. याप्रकरणी गणेश काळे यांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणाचा तपास फौजदार रविराज कोकरे करीत आहेत.

