गुळूंच्यातील दवाखान्यास समस्यांचा विळखा
किशोर कुदळे : सकाळ वृत्तसेवा
वाल्हे, ता.१९ : गुळूंचे (ता.पुरंदर) येथील पशुचिकित्सालयाची इमारत मोडकळीस आली आहे. छताला लागलेली गळती, भितींना तडे गेले आहेत. ठिकठिकाणी
उपकरणांची कमतरता, स्वच्छतागृहाचा अभाव, वीज व पाण्याची गैरसोय अशा विविध समस्यांच्या विळख्यात दवाखाना सापडला आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांसह कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. शासनाने दवाखान्यात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी पशुपालक करीत आहेत. अपुऱ्या सुविधांमुळे पशुपालकांची गैरसोय होत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी दवाखान्यात येणाऱ्या पशुपालकांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. या पशुवैद्यकिय दवाखान्याची जवळपास ४५ वर्षापुर्वीची इमारत असुन एका खोलीमध्ये पशुधन विकास अधिकारी डॉ.संभाजी भंडलकर व परिचर प्रभाकर जगताप कार्यरत आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत गुळूंचेसह नीरा शिवतक्रार, राख, नावळी, कर्नलवाडी, थोपटेवाडी या गावांसह वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, १४ जणांनी महानेशा योजनेचा (मेंढी खरेदीसाठी) लाभ घेतला आहे.
यांची आहे गरज
- नवीन प्रशस्त इमारत
- वीज
- पिण्याचे पाणी
- स्वच्छतागृह व अन्य सुविधा
लसीकरण
लाळ खुरकत.......२९३४
पीपीआर/ इटी (शेळ्या मेंढ्या).......१८५०
लंपी.......१५७०
राणीखेत (मानमोडी कोंबड्या).......१०००
घटसर्प.......५६०
रेबीज.......१६९
फऱ्या.......९०
पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इमारत धोकादायक स्थितीत आहे. दवाखान्यासाठी जागा उपलब्ध
करण्यासाठी प्रयत्न सुरू असुन त्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यास जागा उपलब्ध होऊन या दवाखान्यात उपयुक्त
सुविधा मिळाल्यास पशुपालकांची वेळेची न पैशाची बचत होईल. भौतिक सुविधांच्या वाणवांमुळे पशुवैद्यकीय सेवेला ग्रहण लागले आहे.
- दीपक निगडे, उपसरपंच, गुळूंचे
पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत धोकादायक स्थितीत आहे. जागा खुपच कमी आहे. सहा गावांतील पशुधनाचा विचार करता नवीन प्रशस्त इमारत अत्यावश्यक आहे. तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार)- डॉ.अस्मिता सताळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या गावोगाव वाडीवस्त्यांवर जाऊन लम्पी, लाळ खुरकत आदि लसीकरण मोहीम सुरू आहे. जनावरांच्या संगोपणासाठी सुरू असलेल्या लसीकरणाचा लाभ पशुपालकांनी घ्यावा.
- डॉ.संभाजी भंडलकर, पशुधन विकास अधिकारी
05774
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

