मांडकीत ‘एआय’चा ४० गुंठ्यांत यशस्वी प्रयोग

मांडकीत ‘एआय’चा ४० गुंठ्यांत यशस्वी प्रयोग

Published on

वाल्हे, ता. २६ : एआय तंत्रज्ञान, शास्त्रशुद्ध मार्गदर्शन आणि परिश्रम यांच्या योग्य संगमातून मांडकी (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र नारायण
साळुंखे यांनी यंदा ऊस उत्पादनात लक्षणीय यश मिळवले आहे. केवळ ४० गुंठ्यांमधून तब्बल १११ टन उसाचे उत्पादन घेतले आहे. उसाची सरासरी उंची ४६ कांड्यांपर्यंत वाढल्याने परिसरात त्याचे कौतुक होत आहे.

सोमेश्वरचे सभासद असलेले साळुंखे यांनी यंदा ८६०३२ वाण लागवड करताना एआय प्रणालीवर आधारित नियोजन तंत्र वापरले. बारामती कृषी विज्ञान केंद्र येथील डॉ. विवेक भोईटे, प्रा. संतोष करंजे, प्रा. तुषार जाधव यांनी साळुंखे यांना जमीन, पाणी, पोषण व्यवस्थापन, तसेच उत्पादनवाढीच्या आधुनिक पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. त्यांचे तांत्रिक सल्ले पाळून साळुंखे यांनी खत व्यवस्थापन आणि पीक संरक्षणात योग्य तो समतोल साधला. त्याचप्रमाणे सोमेश्वर कारखान्याचे शेतकी अधिकारी निंबाळकर व कृषी मंडल अधिकारी अनिल दुरगुडे, कृषी सहाय्यक नंदकुमार विधाते यांनी ऊस लागवड, सिंचन वेळापत्रक, रोग-कीड नियंत्रण याबाबत सातत्याने मार्गदर्शन केले.

एआय तंत्रज्ञान वापरल्यामुळे निर्णयक्षमता सुधारली. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन व उत्तम उत्पादन मिळविता येते. खर्च कमी झाला आणि उत्पादनात झपाट्याने वाढ झाली. आगामी हंगामात अधिक परिपूर्ण तंत्रज्ञान वापरण्याचा मानस आहे, असे साळुंखे यांनी सांगितले.


यामुळे वाढला जोमदार ऊस
- जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी सेंद्रिय, रासायनिक, जैविक खतांचा वापर.
- कंपोस्ट, हिरवळीच्या तसेच नैसर्गिक तत्त्वांनी समृद्ध खतांचाही वापर
- पीक संरक्षणात योग्य समतोल साधला
- क्षेत्रभेटींमुळे पिकाच्या वाढीचा योग्य अभ्यास व उपाययोजना


एआय तंत्रज्ञानाने दिलेल्या अचूक सूचना आणि पाण्याचे काटेकोर नियोजन यामुळे उत्पादनात मोठी झेप मिळाली. उसाला रोगराईपासून वाचवण्यासाठी कीटकनियंत्रणाचे बुद्धिमान पर्याय वापरले. परिणामी कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट साध्य झाले.
- महेंद्र साळुंखे, ऊस उत्पादक

‘केव्हीके’ व ‘सोमेश्वर’चे मार्गदर्शन
एआय तंत्रज्ञान, केव्हीकेचे तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच सोमेश्वर कारखान्याच्या अधिकारी वर्गाचे सहकार्य यांच्या योग्य समन्वयातून मिळालेल्या ऊस उत्पदन वाढीच्या यशामुळे महेंद्र साळुंखे यांच्या कार्याची व्यापक चर्चा परिसरात सुरू आहे. कमी क्षेत्रातही योग्य नियोजन, तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन यांचा वापर केल्यास उत्पादनात मोठी वाढ मिळू शकते, याचा प्रत्यक्ष दाखला त्यांच्या अनुभवातून दिसून आल्याचे सोमेश्वरचे संचालक विश्वास जगताप व माजी संचालक मोहन जगताप यांनी सांगितले.

05809

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com