कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटवून पशुधनाचे संरक्षण
वाल्हे, ता. १ : पुरंदर तालुक्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. वाल्हे जवळील भुजबळ कामठवाडी (ता. पुरंदर) येथील तरुण शेतकरी सुशांत रमेश भुजबळ यांनी आपल्या
जनावरांचे संरक्षण करण्यासाठी केलेला उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गोठ्यातील वाढती थंडी कमी करण्यासाठी त्यांनी रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवून
उबदार वातावरण तयार केले आहे. या कल्पक पद्धतीने गाई–वासरांना थंडीपासून मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरातील तापमान एकाएकी घसरले असून, पहाटेच्या सुमारास दंव आणि गारठ्यामुळे जनावरांचे हाल होत आहेत. हे लक्षात घेत सुशांत यांनी जनावरांच्या अंगावर गोणपाटे टाकून उबदार आवरण तयार केले. शिवाय गोठ्यातील सुरक्षित जागी लहान लाकडी शेकोट्या पेटवून उबदार वातावरणाची निर्मिती केली. धुरामुळे त्रास होऊ नये म्हणून त्यांनी गोठ्याची हवा खेळती ठेवत योग्य अंतरावर व्यवस्थापन केले. सुशांत हे जनावरांच्या संगोपनात नेहमीच तत्पर व संवेदनशील असल्याने तीन-चार वर्षांपूर्वी त्यांना ‘आदर्श गोपालक’ पुरस्कार मिळाला होता.
थंडीच्या झळा जनावरांना सर्वात आधी जाणवतात. त्यांना ऊब मिळाली नाही तर त्यांची प्रकृती ढासळते. म्हणूनच गोठ्यातील परिस्थिती बदलणे गरजेचं वाटलं- सुशांत भुजबळ आदर्श गोपालक थंडी वाढली की गाई, वासरांवर सर्वाधिक परिणाम होतो. त्यांची काळजी घेणे हीच खरी गोपालकाची जबाबदारी आहे.
भुजबळ कामठवाडी येथील उपक्रमशील गोपालक सुशांत भुजबळ यांच्या या ऊबदार उपक्रमामुळे जनावरांचे केवळ संरक्षण झाले नाही, तर पशुपालकांसमोरही एक मार्गदर्शक उदाहरण उभे राहिले आहे.
- डॉ.माणिक बनगर, पशुवैद्यकीय अधिकारी, वाल्हे
05844
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

