वागदरवाडीतील शेतकऱ्यांसमोर
५० फुटांवर अवतरला बिबट्या

वागदरवाडीतील शेतकऱ्यांसमोर ५० फुटांवर अवतरला बिबट्या

Published on

वाल्हे, ता. २ : वागदरवाडी (ता. पुरंदर) येथील पवारवाडी परिसरात जानाईमळा येथे मंगळवारी (ता. २) दुपारी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वागदरवाडी येथील शेतकरी मारुती पवार हे नेहमीप्रमाणे मंगळवारी (ता. २) दुपारी दुचाकीवरून आपला मुलगा रूपचंद्र याच्यासह जानाईमळा येथील शेतातील ज्वारी पिकाला पाणी देण्यासाठी निघाले होते. अचानक समोर जेमतेम ५० फुटांवर आलेला बिबट्या पाहून पवार पिता- पुत्र काही क्षणासाठी भयभीत झाले. मात्र मारुती यांनी धैर्य न ढळू देता मोठ्या शिताफीने शेजारील ग्रामस्थांना तत्काळ माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी सदर स्थळी धाव घेतली. तोपर्यंत बिबट्या शेजारील ज्वारीच्या शेतातून पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने त्वरित दखल घेतली. सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ठोले आणि वनपाल दीपाली शिंदे यांच्या
मार्गदर्शनाखाली वनमजूर हनुमंत पवार व किरण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, सागर भुजबळ, कुणाल भुजबळ, अतुल पवार उपस्थित होते.

पवारवाडी हद्दीतील जानाईमळा आणि दौंडज हद्दीतील कदमांचा साफिका या परिसरात यापूर्वीपासून तरस आणि हरणांचा मोठा वावर असतो.
त्यातच आता बिबट्या आल्यामुळे शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. बिबट्या दिसल्यापासून शेतकरी पाणी देण्यासाठी शेतात जाणे टाळत असून घरीच बसण्यास प्राधान्य देत आहेत.
- प्रकाश कदम, शेतकरी

परिसरामध्ये प्रथमच दिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर तरस व
हरणांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र आता त्यातच आता बिबट्याने हजेरी लावल्याने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. कामगार वर्ग व महिलांमध्येही भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा.
- मारुती पवार, शेतकरी

बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला करण्यापूर्वी त्याला सुरक्षितरीत्या पकडून जेरबंद करावे, अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.
- संदेश पवार, सरपंच, सुकलवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com