आडाचीवाडीवासीयांकडून महावृक्षारोपण
वाल्हे, ता. ७ : पर्यावरणासाठी संपूर्ण गाव एकदिलाने उभे राहिले तर त्या गावाची ओळखच बदलते असे जिवंत उदाहरण रविवारी (ता. ७) आडाचीवाडी (ता. पुरंदर) यांनी घालून दिले. पर्यावरणपूरक विचारसरणी, ग्रामस्थांची अभूतपूर्व एकजूट आणि सामूहिकपणे घेतलेला हरित संकल्प यामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित महावृक्षारोपण उपक्रम गावासाठी एक मोठा हरित उत्सव ठरला. सह्याद्री देवराईचे जनक व ज्येष्ठ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
संपूर्ण गाव एकजुटीने रविवारी (ता. ७) सकाळी पहाटेपासूनच वृक्षारोपणासाठी सरसावले होते. उपस्थित मान्यवरांच्या प्रेरणेने ग्रामस्थांनी उत्साहाने वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, आंबा आदि विविध प्रकारची रोपे लावली. गावच्या मुख्य रस्त्यासह उपरस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावून परिसर हरित करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी पूर्ण जोमात पार पाडला. महिलांपासून युवकांपर्यंत तसेच लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मिळून महावृक्षारोपणाला सामूहिक स्वरूप दिले. यामध्ये रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, मुंबई उपजिल्हाधिकारी गीतांजली शिर्के, माजी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच मोहन पवार, मंडल अधिकारी बापूसाहेब देवकर, ग्रामसेवक अनिल हिरास्कर यांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले .गावातील प्रत्येक मुलगा, मुलगी, महिला, युवक, शेतकरी सगळ्यांनी एकच ध्यास घेतल्याचे वातावरण सर्वत्र जाणवत होते. लावण्यात आलेल्या झाडांचे पुढील काळात संवर्धन व देखभाल करण्यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारली. तर सरपंच सुवर्णा पवार यांनी गावाला ‘हरितग्राम’ बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.
वृक्षारोपणामध्ये संपूर्ण गाव स्वतःहून सहभागी होणे ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. प्रत्येक नागरिकाने झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. आडाचीवाडी ग्रामस्थांचा एकोपा व पर्यावरणाबद्दलची जाणीव खरंच वाखाणण्याजोगी आहे. आबालवृद्धांसह लहान मुलं, महिला आणि पुरुष इतक्या उत्साहाने वृक्षारोपणात सहभागी होत आहेत, ही अत्यंत मोठी गोष्ट आहे.
- सयाजी शिंदे, सिनेअभिनेते
5926
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

