डीपी जळाल्याने कर्नलवाडीत पिकांचे नुकसान
वाल्हे, ता. ९ : कर्नलवाडी (ता. पुरंदर) परिसरातील झिरीपवस्तीमध्ये १० दिवसांपासून डीपी जळाल्याने शेकडो एकर क्षेत्रातील कांदा, गहू, ज्वारी, हरभरा तसेच रब्बी हंगामातील इतर पिकांना पाणीपुरवठा करता येत नसल्याने गंभीर संकट ओढवले आहे. पाण्यावर संपूर्णपणे अवलंबून असलेले शेतकरी महावितरणच्या दारात हेलपाटे घालत असले तरी अद्यापही ठोस उपाय न झाल्याने शेतकरी संतापले आहेत.
झिरीपवस्तीमध्ये जळालेल्या डीपीमुळे सिंचनासाठीचा वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून, परिसरातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. रात्री- दिवसा फिरून पिकांना पाणी देण्यासाठी व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असला तरी विजेशिवाय विहिरी व बोअरवेल बंदच आहेत. या अनिश्चिततेत उभी पिके पाण्याअभावी जळू लागल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण कष्ट पाण्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
डीपी जळून १० दिवस झाले आहेत. आम्ही अधिकारी, लाइनमन यांना वारंवार फोन आणि प्रत्यक्ष भेटी देत आहोत. मात्र, ‘डीपी नाही’, ‘दोन दिवसात येईल’, ‘चार दिवसात बसवू’ अशीच उत्तरे मिळतात. पण प्रत्यक्षात कोणतीही हालचाल नाही. पाण्याअभावी कांदा, हरभरा, गहू, ज्वारीचे पीक कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी वेळेत पिकास पाणी न मिळाल्यास अर्धा हंगाम वाया जाईल.
- साईनाथ चव्हाण, शेतकरी
जळालेला डीपी जागेवरच दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण तो कार्यान्वित झाला नाही. त्यामुळे आम्ही नवीन डीपीसाठी वरिष्ठांना लेखी अहवाल पाठवला आहे. दोन दिवसांत डीपी बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- आलम मणियार, सहाय्यक अभियंता, नीरा
05951
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

