डरकाळीमुळे पिंगोरीकर भयभीत
वाल्हे, ता.९ : पिंगोरी (ता.पुरंदर) परिसरात बिबट्यांचे दर्शन नेहमी घडत आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची उपस्थिती
दिवसाढवळ्या वाढली आहे. यामुळे शेतकरी व जनावरांना सांभाळणारे मेंढपाळ धास्तावले आहेत. बिबट्या डोंगर–दऱ्यांपुरता मर्यादित न राहता थेट लोकवस्तीच्या उंबरठ्यावर येऊ लागल्याने याबाबतची चिंता वाढली आहे.
पिंगोरीतील शिंदेनगर येथील उत्तम शिंदे हे सोमवार (ता. ८) दुपारी नेहमीप्रमाणेशेळ्या व गाई–जनावरांसह वेलदरा परिसरातील माळरानावर बसले
होते. दुपारी तीनच्या सुमारास शेळ्या चरत असताना अचानक गवतामध्ये दबा धरून पुढे सरकणारा बिबट्या त्यांच्या नजरेस पडला. बिबट्याने फोडलेली डरकाळी ऐकताच शिंदे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने जवळच असलेले वसंत शिंदे आणि बबन शिंदे हे तत्काळ धावून आले. तेवढ्यात बिबट्या झाडीत पळून गेला. या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिन्यातून पंधरा दिवसांत किमान एकदा बिबट्याचे हालचाली असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
शेतकऱ्यांना रात्री जनावरांचा पहारा करणे भाग पडत असून, हा सावधपणा दिवसाढवळ्याही करावा लागत आहे. बिबट्या इतक्याजवळ येतोय की शेळ्या–मेंढ्या राखणे कठीण झालंय. वेळेआधी कारवाई झाली नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. रोजच्या शेतीकामात आता जिवाची भीती वाटू लागली आहे. जनावरं सोडताना एक क्षण डोळे झाकता येत नाहीत.
- वसंत शिंदे, कवडेवाडी शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

