वाल्हे येथे डॉ. आढाव, सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण

वाल्हे येथे डॉ. आढाव, सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण

Published on

वाल्हे, ता. १० : वाल्हे (ता. पुरंदर) येथे बुधवारी (ता. १०) बाजारपेठेमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर समाजवादी, पुरोगामी विचारवंत आणि राष्ट्रसेवा दलाचे माजी तसेच श्रमिक, शोषित, वंचितांचे आधारवड डॉ. बाबा आढाव व पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती गिरीश पवार, दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, सत्यवान सूर्यवंशी, संभाजी पवार, बाळासाहेब भुजबळ, विक्रमसिंह भोसले, रणसिंग पवार, दत्तात्रेय राऊत, हरीश दुबळे, कांतिलाल पवार, प्रताप पवार, विनोद पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. शोकसभेत पुरोगामी कार्यकर्ते यावेळी अ‍ॅड. धनंजय ताकवले, आतिष जगताप, सतीश पवार आणि श्रीकांत लक्ष्मीशंकर यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. बाबा आढाव आणि स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे वाल्हे येथील गांधी मैदानावर झालेल्या उत्स्फूर्त भाषणांचे स्मरण केले. त्या तेजस्वी क्षणांची आठवण करत ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या वाल्हे येथील आठवणींना उजाळा दिला. वाल्हे राष्ट्र सेवा दल व ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रवींद्र लंबाते, उमेश पवार, सतीश पवार, तानाजी पवार, लाला आतार आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. राजेंद्र गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

5956

Marathi News Esakal
www.esakal.com