भरधाव मोटारीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

भरधाव मोटारीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Published on

वाल्हे, ता. २३ : येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयासमोर मंगळवारी (ता. २३) आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर रस्ता ओलांडत असताना भरधाव मोटारीच्या धडकेने एका वृद्धाचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित चालक मोटार न थांबवता भरधाव निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
वागदरवाडी (ता. पुरंदर) जवळील बाळाजीचीवाडी येथील सर्जेराव शंकर पवार (वय ७२) असे मृत वृद्धाचे नाव आहे. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाच्या अलीकडील विस्तारीकरणादरम्यान वाल्हे परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, या कामात गावांतर्गत ये-जा करणारे जुने रस्ते व सुरक्षित क्रॉसिंग कालबाह्य झाल्याने ग्रामस्थ व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे या ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघात घडत असून मंगळवारी या अपघातात एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला. मंगळवारी वाल्हे येथील आठवडे बाजारासाठी सर्जेराव पवार हे वागदरवाडी येथून वाल्हे येथे येत होते. दुपारी महर्षी वाल्मीकी विद्यालयासमोरील महामार्ग ओलांडत असताना निरेहून जेजुरीकडे जाणाऱ्या भरधाव मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यांना ग्रामस्थांनी तत्काळ उपचारासाठी जेजुरी येथील रुग्णालयात हलवले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक केशव जगताप यांनी दिली. महामार्ग विस्तारीकरणानंतर वाल्हे गाव परिसरात सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक ठिकाणी भुयारी मार्ग, उड्डाणपूल अथवा वेगमर्यादा व संकेत फलकांची तातडीने आवश्यकता असल्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. संबंधित वाहन चालकाचा शोध पोलिस घेत असून पुढील तपास सुरू आहे.

वर्षभरात एकाच कुटुंबात तिघांचा मृत्यू
अपघातात मृत्यू झालेल्या सर्जेराव शंकर पवार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्जेराव पवार यांच्या पत्नी व मुलाचे यापूर्वीच निधन झाले असून, आज सर्जेराव पवार यांचाही अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने अवघ्या एका वर्षात एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचे निधन झाले आहे. या घटनेमुळे बाळाजीचीवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला असल्याची माहिती वागदरवाडीचे पोलिस पाटील महेंद्र पवार यांनी दिली.

6028

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com