विद्यार्थ्यांसाठी वाल्हे येथे दंत तपासणी उपक्रम

विद्यार्थ्यांसाठी वाल्हे येथे दंत तपासणी उपक्रम

Published on

वाल्हे, ता. ५ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवारी (ता. ५) दंत तपासणी व जनजागृती कार्यक्रम पार पडला. पिंगोरी येथील इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रकृती’ ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
या दंत तपासणी शिबिराचे उद्‍घाटन शाळेचे मुख्याध्यापक भारत वाघोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राहुल लोणकर, माऊली खोमणे, आक्रम इनामदार, संतोष जगताप, जयश्री पवार, कीर्ती लिपारे, नयना पवार, नीलेश दुर्गाडे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात ८ ते १० वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची दातांची तपासणी करून त्यांना दंत आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दातांची निगा योग्य पद्धतीने न राखल्यास होणारे आजार, दातांची कीड, दातदुखी याबाबत माहिती देण्यात आली. तसेच दररोज सकाळी व रात्री ब्रश करण्याची सवय, संतुलित आहाराचे महत्त्व आणि नियमित तपासणीची गरज विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. डॉ. कौस्तुभ कुलकर्णी आणि डॉ. निवेदिता पांडे, डॉ. मुरलीधर महाजन यांनी दंत तपासणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना दंत स्वच्छतेसाठी आवश्यक ब्रश व टूथपेस्टचे वाटप करण्यात आले.


लहान वयातच दंत आरोग्याची सवय लागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज दोन वेळा योग्य पद्धतीने ब्रश करणे, जास्त गोड पदार्थ टाळणे आणि दातांची नियमित तपासणी केल्यास भविष्यात होणारे अनेक दंत विकार टाळता येतात. अशा शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांमध्ये दंत आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.
- डॉ. निवेदिता पांडे

वाल्हे : विद्यार्थ्यांची दातांची तपासणी करताना डॉ. निवेदिता पांडे, डॉ. कौस्तुभ कुलकर्णी व इतर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com