तुकाराम महाराज पालखीचे दौंडमध्ये स्वागत

तुकाराम महाराज पालखीचे दौंडमध्ये स्वागत

Published on

यवत, ता. ३ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बोरीभडक गावच्या हद्दीत दौंड तालुक्यात प्रवेश झाला. या वेळी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी राजकीय पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, भाविक उपस्थित होते.
कदमवाक वस्ती येथील मुक्कामानंतर सोहळा उरुळीकांचन येथे दुपारच्या विश्रांतीसाठी थांबला. तेथून पुढे दुपारी चारच्या सुमारास सोहळा बोरीभडक येथे पोहोचला. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने दौंड तालुक्यातील भाविक उपस्थित होते. स्थानिक नागरिकांच्या वतीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, कांचन कुल, तुषार थोरात, नितीन दोरगे, भिमापाटसचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील, दौंडचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, हवेलीचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारी, दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.