दसऱ्यामुळे बहरला यवतला फुलांचा बाजार

दसऱ्यामुळे बहरला यवतला फुलांचा बाजार

Published on

यवत, ता. १ : यवत (ता.दौंड) येथे विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १०) फुलांचा बाजार भरला होता. महामार्गालगतच्या सेवा मार्गालगत स्थानिक शेतकऱ्यांनी विविध फुले विक्रीसाठी ठेवली होती. यात केशरी व पिवळ्या झेंडूचे प्रमाण लक्षणीय होते. फुलांचे गाव असा लौकिक असलेल्या यवतमधील बाजारातही झेंडू शंभर रुपये प्रतिकिलोने विकला गेला.
यवत परिसरात सुमारे २४० हेक्टर क्षेत्र फूल पिकाखाली आहे. यात शेवंती, झेंडू, गुलाब, गुलछडी, जरबेरा या फुलांचा प्रामुख्याने समावेश होतो. झेंडूची शेती ही हंगामी स्वरूपात केली जाते. प्रामुख्याने नवरात्र, विजयादशमी आणि दीपावली या काळात झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. यासाठी बहुतांश शेतकरी झेंडूची लागवड करतात. इतर फुलांच्या तुलनेत झेंडू हे कमी काळात व कमी खर्चात येणारे पीक असल्याने हे पीक बऱ्याचदा चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देते. सनासुदीचा जास्तीचा खर्च भागवण्यात झेंडूचा चांगला हातभार लागतो असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या पावसामुळे फुलांचे काही प्रमाणात नुकसान झाले. याही पेक्षा सोलापूर जिल्ह्यातून या काळात मोठ्या प्रमाणात झेंडू पुण्याच्या बाजारात येत असतो. मात्र मागील काही दिवसांपासून या भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे या भागातून होणारी फुलांची आवक कमी झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा परिणाम म्हणून अद्याप फुलांना समाधानकारक बाजारभाव मिळत आहे.

पावसाने फुलशेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांना अपेक्षित बाजारभाव नाही. प्रत्यक्षात या काळात अधिक बाजारभाव मिळाला पाहिजे. तो न मिळण्यात प्लॅस्टिकची फुले हे मोठे कारण आहे. त्या विरुद्ध आमचा सुरू असलेला न्यायालयीन लढा अंतिम टप्प्यात आहे.
- राहुल पवार, शेतकरी खुटबाव (ता.दौंड)

01499

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com