बाणेर ते सूस रस्त्यावर दुचाकीस्वार जायबंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाणेर ते सूस रस्त्यावर दुचाकीस्वार जायबंदी
बाणेर ते सूस रस्त्यावर दुचाकीस्वार जायबंदी

बाणेर ते सूस रस्त्यावर दुचाकीस्वार जायबंदी

sakal_logo
By

बावधन, ता.१० : मुंबई -''बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडे येण्याच्या दिशेला बाणेर ते सूस दरम्यान रस्ता सिमेंट मजबुतीकरणासाठी खोदून खडबडीत केला आहे. सोमवारी (ता.१० जानेवारी) दिवसभरात बहुतांश दुचाकी घसरून नागरिक जायबंदी झाले. महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिक जखमी झाल्याने त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखला करावा, अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटिका स्वाती ढमाले यांनी केली आहे.
सूस रस्त्यावर दुचाकीस्वारांना गाडी चालविताना खडबडीत रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे अनेक दुचाक्या घसरल्या. गाडी घसरून आपटल्याने दुचाकीवरील नागरिक जखमी झाले. त्यातील कांचन मधुकर गोडसे, आबू बकार बानेश, रोहीत वासन, समीर (पूर्ण नाव समजले नाही) आणि एक चिमुकला बावधन येथील चेलाराम रुग्णालयात उपचार घेत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top