एकवीरा देवीचा जयघोष 
पालखी सोहळा उत्साहात; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

एकवीरा देवीचा जयघोष पालखी सोहळा उत्साहात; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Published on

लोणावळा, ता. ८ : वेहेरगाव, कार्ला गडावरील एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेनिमित्त शुक्रवारी पालखी सोहळ्यास भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकवीरा आईच्या जयघोषाने गडाचा परिसर दुमदुमून गेल्याचे चित्र या वेळी दिसून आले.

एकवीरा देवी असंख्य कोळी, आगरी भाविकांसह राज्यातील जनतेचे श्रद्धास्थान आहे. देवीचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या देवघर येथील काळभैरवनाथ देवाच्या पालखी सोहळ्याने या यात्रेस सुरवात झाली. शुक्रवारी यात्रेचा व पालखी सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने दर्शनासाठी मुंबई, ठाणे, कोकणासह राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच देवाचा नवस फेडण्यासाठी भाविकांची रांग लागली होती.

पालखीच्या मानकऱ्यांच्या हस्ते देवीस अभिषेक, महाआरती व विधिवत पूजा करत
साडीचोळी अर्पण करण्यात आली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. भाविकांच्या दर्शनासाठी देवस्थान व प्रशासकीय समितीच्यावतीने विशेष व्यवस्था केली होती. मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे हे पालखी सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.

पोलिसांकडून चोख बंदोबस्त
कार्ला परिसरात यात्रा काळात दारुबंदी असल्याने पोलिस येणाऱ्या वाहनांची तपासणी करत असल्याचे चित्र दिसून आले. प्रशासनाने गडावर वाद्यकाम व फटाक्यांवर बंदी घातली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील, लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

PNE22S55399

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com