
दि पूना मर्चंट्स चेंबरच्या अध्यक्षपदी राजेंद्र बाठिया दि पूना मर्चंटस् चेंबरच्या अध्यक्षपदी राजेंद्र बाठिया
मार्केट यार्ड, ता. १५ : भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेली दि पूना मर्चंट्स चेंबरच्या अध्यक्षपदी राजेंद्र बाठिया यांची तर उपाध्यक्षपदी अजित बोरा यांची बिनविरोध निवड झाली. तसेच, सचिवपदी रायकुमार नहार, सहसचिवपदी ईश्वर नहार यांची निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळावर स्वीकृत सदस्य म्हणून शुभम गोयल, दिनेश मेहता, महिपालसिंह राजपुरोहित आणि संदीप शहा यांची नियुक्ती केल्याची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी दिली.
चेंबरची २०२१-२०२२ या वर्षाची कार्यकारिणी सभा बुधवारी पार पडली. यामध्ये नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. राजेंद्र बाठिया म्हणाले, ‘‘सभासदांनी विश्वास ठेऊन आम्हास व्यापाऱ्यांच्या हितासाठी निवडून दिले आहे. व्यापाऱ्यांनी टाकलेला विश्वास आणि जबाबदारीची जाणीव ठेवून व्यापाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहेत. कोरोना काळात व्यापाऱ्यांना अनेक नव्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..