बटाटा, शिमला मिरची, हिरवी मिरचीच्या भावात वाढ

बटाटा, शिमला मिरची, हिरवी मिरचीच्या भावात वाढ

मार्केट यार्ड, ता. ९ : बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर आहे. मात्र मागणी वाढल्यामुळे बटाटा, हिरवी मिरची आणि शिमला मिरचीच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली असून टोमॅटोच्या भावात घट झाली आहे. इतर सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे १०० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. मध्यप्रदेशमधून २८ ट्रक मटार, तमिळनाडू, गुजरात, आंध्रप्रदेश येथून १० ट्रक हिरवी मिरची, राजस्थान येथून १२ ट्रक गाजर, उत्तरप्रदेशातून कोबी पाच टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून दोन टेम्पो शेवगा, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसूण १२ ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले १३०० पोती, गवार सात टेम्पो, टोमॅटो आठ हजार क्रेट्स, फ्लॉवर १२ टेम्पो, कोबी सहा टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा १०० ट्रक, आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ३२ ट्रक इतकी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

फळभाज्यांचे १० किलोचे भाव
कांदा : २००-३२०, बटाटा : १२०-१६०, लसूण : २००-४००, आले सातारी : १००-१७०, भेंडी : ५००-७००, गवार : गावरान व सुरती ५००-७००, टोमॅटो : १५०-२००, दोडका : ४००-५००, हिरवी मिरची : ४००-६००, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : ४००-५००, काकडी : २००-३००, कारली : हिरवी ४००-५००, पांढरी : ३५०-४००, पापडी : ४००-४५०, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : १००-१५०, कोबी : १५०-२२०, वांगी : ६००-८००, डिंगरी : ३५०-४००, नवलकोल : १५०-२००, ढोबळी मिरची : ५००-७००, तोंडली : कळी ४००-४५०, जाड : २००-२२०, शेवगा : १२००, गाजर : १५०-२००, वालवर : ४००-४५०, बीट : २२०-२५०, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : ३५०-४००, ढेमसे : ३५०-४००, भुईमूग शेंग : ४००-४५०, मटार : २५०-२८०, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

डाळिंब, संत्रा, मोसंबी, खरबूज, बोरे, लिंबू महागले़
मार्केटयार्डात रविवारी डाळिंब, संत्रा, मोसंबी, बोरे, लिंबे, खरबुजाच्या भावात वाढ झाली असून सफरचंदाच्या भावात घट झाली आहे तर अननस, कलिंगड, सीताफळ, पपई, चिक्कू, पेरू आणि द्राक्षांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
कलिंगड तीन टेम्पो, खरबूज तीन टेम्पो, अननस सात ट्रक, मोसंबी ३० टन, संत्री
२० टन, डाळिंब २५ टन, लिंबे दोन हजार गोणी, पेरू ७०० क्रेट, चिक्कू दोन हजार बॉक्स, बोरे ३०० गोणी, सफरचंद दोन हजार पेटी, द्राक्षे १२ टन इतकी आवक झाली. लिंबाच्या गोणीमागे ५० रुपयांनी वाढ झाली. डाळिंब, संत्रा आणि मोसंबी १० टक्क्यांनी, खरबूज किलोमागे पाच रुपयांनी तर बोरे २५ टक्क्यांनी महागली आहेत तर सफरचंदाच्या पेटीमागे १०० रुपयांनी घट झाली आहे.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे
लिंबे (प्रति गोणी) : २५०-३५०, अननस (डझन) : ७०-२७०, डाळिंब (किलो) भगवा : ४०-१८०, आरक्ता : २०-६०, गणेश ः १०-३०, मोसंबी : (३ डझन) : ३२०-५५०, (४ डझन) : १५० ते २५०, संत्रा : (१० किलो) : ३००-७००, कलिंगड : २०-२५, खरबूज : ३०-४०, पपई : १०-१२, चिक्कू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो) : ४००-५००, कश्मीर डेलिसिअस (१५ ते १६ किलो) :१०००-१३००, किन्नोर (२५ ते ३०) : ३०००-३५००, बोरे चमेली (१० किलो) : ३००-४००, उमराण : ८०-१२०, चेकनट : ८००-८५०, चण्यामण्या : ८००-९००, द्राक्षे जम्बो (१० किलो) : ५००-९००, सोनाका : ४००-७००, माणिकचमण : ४००-५००.


बोरांना मागणी वाढली
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बोरांना मागणी वाढली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने भावात तब्बल २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असून वाढलेले दर संक्रांतीपर्यंत चढेच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

फुलांच्या भावात घसरण
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यापार्श्वभूमीवर फुलांना मागणीही घटली असून परिणामी भावामध्ये घट झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे :
झेंडू : १०-३०, गुलछडी : १६-४०, अष्टर : जुडी- ८-१२, सुट्टा- ५०-७०, कापरी : ३०-३०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ५०-८०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ६०-८०, शेवंती काडी ः ३०-६०, लिलियम (१० काड्या) ः ८००-१०००, आॅर्चिड ः ३००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ४०-५०.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com