हमाल पंचायतीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबा आढाव बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हमाल पंचायतीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबा आढाव बिनविरोध
हमाल पंचायतीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबा आढाव बिनविरोध

हमाल पंचायतीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबा आढाव बिनविरोध

sakal_logo
By

पुणे, ता. २ : कामगार संघटनेची व्यवस्थापन समिती असलेल्या हमाल पंचायतीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत डॉ. बाबा आढाव यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मार्केट यार्डातील हमाल भवन येथे रविवारी निवडणूक व मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

हमाल पंचायतीने एक चांगला आदर्श देशापुढे ठेवावा. हमाल पंचायत देशातील शेतकरी, इतर कष्टकरी, कामगार व महिला वर्ग यासाठी योग्य ते मार्गदर्शन व दिशा देण्याचे काम करील, अशी भावना डॉ. आढाव यांनी निवडीनंतर व्यक्त केली. निष्ठावंत पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये झालेल्या लढतीत निष्ठावंत पॅनलने बाजी मारली. संघटनेच्या अन्य जागांवर अंकुश अवताडे, सोपान धायगुडे, दत्तात्रेय डोंबाळे (उपाध्यक्ष), गोरख मेंगडे (सरचिटणीस), चंद्रकांत मानकर (खजिनदार), विष्णू गर्जे, संदीप मारणे (संघटक), संदीप धायगुडे, विनोद शिंदे, अरुण डोलारे, वत्सला गवळी (सहचिटणीस) निवडून आले आहे. मतदान व मतमोजणीदरम्यान प्रभाकर केतकर यांनी निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांना हमाल पंचायत कष्टकरी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल गिरमे व हमाल पंचायतीचे व्यवस्थापक हुसेन पठाण यांनी सहकार्य केले.