‘संधी मिळाल्यास रोबोटिक्समध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकतील’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘संधी मिळाल्यास रोबोटिक्समध्ये
ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकतील’
‘संधी मिळाल्यास रोबोटिक्समध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकतील’

‘संधी मिळाल्यास रोबोटिक्समध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकतील’

sakal_logo
By

केसनंद, ता. २१ : भविष्यातील शिक्षणात रोबोटिक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, जिल्हा परिषद शाळांमधील हुशार विद्यार्थ्यांना राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत संधी दिल्यास ते नक्कीच स्वत:ला सिद्ध करून देशाची मान उंचावतील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला. लोणीकंद (ता. हवेली) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना झेड. एफ. असोसिएशन, रोबोटिक्स इंडिया व रोटरी क्लब यांच्या वतीने ५० रोबोट कीटचे वाटप प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

‘‘सध्या उद्योगांसह प्रत्येक क्षेत्रात रोबोटचा वापर वाढत आहे. त्यादृष्टीने शालेय स्तरावरच मुलांना रोबोटिक्सचे शिक्षण मिळावे, याकरिता लोणीकंद सारख्या गावातील विद्यार्थ्यांनाही रोबोटिक्समध्ये जागतिक पातळीवर चमकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी येथील शाळेला आणखी ४० संगणकही देण्यात येणार आहेत. कोरोनामुळे शिक्षणात पडलेला खंड भरून काढण्यासाठी जिल्हा परिषदेने १० कलमी कार्यक्रम आखला असून, यात इन्फोसिसच्या माध्यमातून सुरू असलेल्या ई-लर्निंग ॲप्लिकेशनचाही वापर प्रभावी ठरणार आहे,’’ असेही प्रसाद या प्रसंगी म्हणाले.

या वेळी गटशिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे, विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ, रोबोटिक्स इंडियाच्या संचालिका पायल राजपाल, पंचायत समितीचे उपसभापती संजीवनी कापरे, शालेय समिती अध्यक्ष जय कंद, मुख्याध्यापक हरीश लंघे आदी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर माजी मुख्याध्यापक गोरक्षनाथ झुरुंगे यांनी आभार मानले.