metro
metrosakal

पुणे : महामेट्रोमुळे वाढणार उद्योगनगरीचा वेग

‘रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम’ या घोषातून आपल्या शहराची वाहतूक व्यवस्था संपूर्ण बदलते आहे

पुणे शहराच्या विकासात आंतरराष्ट्रीय दर्जाची मेट्रो रेल स्थापन करून नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
महामेट्रो प्रकल्पामुळे वाहतुकीच्या क्षेत्रात नवीन पाऊल पुढे पडेल. उद्योगनगरीचा वेग वाढेल. पुण्याच्या आसपासच्या उद्योग वस्त्या खऱ्याअर्थाने विकासाच्या वाहक बनतील आणि कॉरिडॉर तीन हिंजवडीच्या नियोजित मेट्रो प्रकल्पामुळे लवकरच पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी भविष्यात कमी होईल.
- प्रा. डॉ. शैलजा दीपक देसाई

metro
Children's Vaccination : CoWIN वर रजिस्ट्रेशन कसे करावे? जाणून घ्या

हैदराबाद, चेन्नई, मुंबई या महानगरात मेट्रो रेल्वे सुरू होऊन लोकप्रियही झाली. यापाठोपाठ पुणे शहरात महामेट्रोच्या कामाची लगबग लॉकडाउन नंतर वाढली आहे. ‘रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम’ या घोषातून आपल्या शहराची वाहतूक व्यवस्था संपूर्ण बदलते आहे. पारंपरिक पीएमटी बस सेवा जाऊन पीएमपीएमएल बससेवा, लोकल ट्रेन असो अथवा खासगी वाहतूकदार रिक्षावाले, सिक्स सीटर, टमटम एवढेच काय ते आपल्या वाट्याला आलेले. परंतु आता इलेक्ट्रिक रेल्वे, मोनोरेल, मेट्रो ट्रेन हे शब्द कानावर पडू लागले आहेत. नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची महाराष्ट्र मेट्रोमध्ये पुनर्रचना होऊन पुणे शहरासाठी महामेट्रोचा ८३१३ कोटी रुपयांचा प्रकल्प २३ जानेवारी २०१७ रोजी सुरु होऊन आता आकाराला येऊ लागला आहे. तसेच, हा प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेईकल म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारची समान भागीदारी असलेला असून त्याची भांडवल उभारणी खुल्या बाजारातून किंवा राज्य सरकारच्या वित्तीय कंपन्यांकडून होत आहे. (slogan 'Rapid Transit System' changes the entire transportation system of city)

मेट्रो रेल्वे मार्गांची उत्सुकता सर्वांनाच होती की एवढ्या गर्दीच्या रस्त्यांवरून रेल्वे मार्ग कसा असेल, कोठून असेल असे अनेक प्रश्न पुणेकरांना आहेत. अशा शंका-कुशंका आणि उत्सुकतामय वातावरणात हा प्रकल्प धडाडीने सुरू झाला आहे. हा रेल्वे मार्ग ‘व्हायडक्ट’ म्हणजे जमिनीवरच्या लांबच लांब पुलासारख्या रचना करून त्यावरून तयार केला आहे. त्यामध्ये विशिष्ट अंतरावर स्टेशन्स, पोटमाळे, सरकते जिने इत्यादी बांधकामे समाविष्ट आहेत.

मेट्रो रेल्वे कॉरिडॉर एक :
- पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट
- सदर रेल्वे मार्ग उन्नत आणि भुयारी अशा मिश्र स्वरूपाचा
- एकूण स्टेशन- १४

metro
Omicron Updates : देशात सर्वाधित रूग्ण दिल्लीत; महाराष्ट्राचा नंबर दुसरा

मेट्रो रेल्वे कॉरिडॉर दोन :
- वनाज ते रामवाडी
- एकूण स्टेशन- १६ स्टेशन
- भुयारी मार्ग नसणार

५५ किमी परिसरात जाळे
पिंपरी-चिंचवड ते दापोडी, रामवाडी ते वाघोली, हडपसर ते वाघोली, स्वारगेट ते कात्रज, शिवाजीनगर ते हिंजवडी,
शिवाजीनगर कोर्ट ते लोणी काळभोर, हडपसर ते सासवड इ. सुमारे ५५ किलोमीटरच्या परिसरात ट्रेनचे जाळे पसरणार आहे.

२६ मेट्रो ट्रेन प्रवास करतील
मेट्रो मार्गांवर रिपेअर ॲण्ड मेन्टेनन्स, हॉल्ट, व्हील री प्रोफाइल वगैरे कामांसाठी मेट्रो डेपो असतील. मेट्रो ट्रेनला ९०० व्यक्तींची क्षमता असलेले तीन डबे असतील आणि वाहतूक भाडे १० ते ५० रुपयांपर्यंत असेल जे प्रामुख्याने वाहतूक थांब्यांच्या टप्प्यावर अवलंबून असेल. ताशी ३३ किमी वेगाने २६ मेट्रो ट्रेन्स दिमाखात प्रवास सुरु करतील. स्टेशनचे सुशोभीकरण थोरामोठ्यांची चरित्रे, वचने, पेंटिंग्स यामुळे होईल.

metro
सावंतवाडी : पाण्याने भरलेल्या पिंपात बुडून बालकाचा मृत्यू

उद्योगधंद्यांना मिळणार उभारी
गेल्या दशकात बंगळूर, चेन्नई, कोची, कोलकत्ता, हैदराबाद, दिल्ली येथे मेट्रो ट्रेन सुरू झाल्या. बंगळूर येथे रेशीम उद्योग जोडणारी २९ ठिकाणे मेट्रोच्या ग्रीन लाईनमध्ये आहेत तर दिल्ली येथे द्वारका सेक्टर ते विमानतळाची मेट्रो ऑरेंज लाईन म्हणून ओळखतात. या शहरांमध्ये आता पुण्याचा समावेश होईल. भारतातील सातव्या आणि महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर पुणे हे शहर आहे. विद्येचे माहेरघर, पूर्वेकडील ऑक्सफर्ड, सांस्कृतिक शहर अशी बिरुद या शहराला लाभली आहेत. इतकेच नव्हे तर आयटी उद्योग, इंजिनिअरिंग व ऑटोमोटिव्ह उद्योग, खेळ, साहित्य-संस्कृतीचा मिलाप असलेले शहर. २०१८ या वर्षात सिंगापूरशी एमओयु झाल्यामुळे पुण्यामध्ये विविध उद्योगधंदे, ट्रॅफिक मॉनिटरिंग, सांडपाणी पुनर्निर्माण प्रकल्प, अर्बन सोल्यूशन आणि वित्तीय कंपन्या स्थापन झाल्या आहेत. उदा. हाय फ्लक्स, ईटोन हाऊस, डीबीएस बँक अशा सिंगापूर मालकीच्या कंपन्या पुण्यामध्ये प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीत अग्रेसर ठरल्या आहेत. या उद्योगधंद्यांना उभारी येण्यासाठी व प्रामुख्याने वाहतुकीची संसाधने पुरवण्यासाठी पीएमआरडीए, मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग ॲण्ड अर्बन अफेअर्सची स्मार्ट सिटी योजना आणि आता मेट्रो प्रकल्प कटिबद्ध आहेत. पुण्याची लोकसंख्या १९५० मध्ये पाच लाख होती तर आता ६८ लाखांच्यावर गेली आहे. म्हणजे सुमारे वार्षिक अडीच टक्क्याने वाढणाऱ्या आणि या लोकसंख्येत ६२ टक्के लोकसंख्या तिशीच्या आत असल्याने या उत्पादक घटकांना रोजगार आणि महाराष्ट्रात संसाधने उपलब्ध करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट होय.

metro
बेळगाव : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळापत्रकाची प्रतीक्षा, शिक्षण खात्याचे वेट अँड वॉच

रोजगार संधी उपलब्ध होणार
मेट्रो प्रकल्पामुळे तांत्रिक, कुशल, अकुशल अशा सर्व प्रकारच्या कामगारांना रोजगार संधी उपलब्ध होतील. तांत्रिक क्षेत्रात ऑपरेटर्स, सुपरवायझर, रूट सेक्शन मॅनेजर, ड्रायव्हर, सिग्नलींग डिझाईन मॅनेजर, सिग्नलींग चेकर तर नियंत्रण क्षेत्रात मेट्रो तिकीट कक्ष, तिकीट चेकर्स, स्टेशन प्रवेश कक्ष, निर्गमन कक्ष, स्वच्छता व प्रसाधन कक्ष इत्यादींचा समावेश होऊन सुरक्षा कर्मचारी आणि देखभाल स्टाफ यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच स्वच्छता आणि सुरक्षितता यासाठी आऊटसोर्सिंग करून कामाची विभागणी करण्याकडे अधिकारी सूत्रांचा कल आहे.

परवडणारी घरे मिळणार
मेट्रो रेल्वे प्रवास भाडे आकारताना महसूल वाढवण्यासाठी प्रवास शुल्क न वाढविता किंबहुना ते माफक ठेवून इतर क्षेत्रातून व्यापारी महसूल प्राप्त करेल. यामध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनवर दुकाने, कॅन्टीन्स, मॉल्स उपलब्ध होतील. यामध्ये लिजमेंट राईट किंवा टेंडर भरून रीतसर दुकानाची विक्री होईल. टीओडी आणि वाढीव एफएसआयमुळे बांधकाम क्षेत्र उभारीला येऊन नवीन बांधकामांमुळे परवडणारी घरे ग्राहकांना मिळू शकतात. मेट्रो मार्गावरील व्यापारी केंद्रे, दुकाने इत्यादींचे नवीन बांधकामात रूपांतर झाले तर त्यांच्या नफ्याचे प्रमाणही वाढू शकेल. रहिवासी जागांचे रूपांतर पुनर्निर्माण तथा रिडेव्हलपमेंटमध्ये होण्यात बऱ्याच ठिकाणी कल दिसत आहे. सदर मार्गावर योग्य अशा पार्किंग सुविधा नवीन बांधकामामुळे देता येतील. जेव्हा एखादी सार्वजनिक वाहतूक लोकप्रिय होते, तेव्हा नागरिकांकडून लांब अंतराच्या रोजगार संधी स्वीकारल्या जातात असे दिसून येते. खासगी वाहनांची रस्त्यावरील गर्दी कमी होऊन अपघातांची संख्या कमी होते. समुदाय केंद्र, विरंगुळा केंद्र, पाळणाघर, अंगणवाड्या, मेट्रो म्युझियम, फोटो गॅलरी अशी नवीन संसाधने निर्माण होऊन जीवनस्तर उंचावून रोजगार संधी निर्माण होतात. प्रत्येक स्टेशनवर बायो डायजेस्टर प्लांट निर्माण केल्यास सेंद्रिय टाकाऊ पदार्थ, मलमूत्र यातून खत, ऊर्जा मिळवणे शक्य होईल; शिवाय टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट आणि रोजगार संधी असा दुहेरी फायदा होऊ शकतो.

मेट्रो प्रकल्पातून नक्की काय होणार?
१) मेट्रो प्रकल्पात झाडे लावणे, मेट्रो मार्गावरील काढलेल्या झाडांची पुनर्लागवडी करण्यास प्राधान्य दिले आहे.
२) सौर ऊर्जा आणि वायू ऊर्जेचा वापर केल्यामुळे प्रदूषणाचा धोका कमी होऊन खर्चाची बचत हाईल.
३) मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या किमान दोन किलोमीटर अंतरावरील सर्व रस्त्यांवर मेट्रो स्टेशनवर नागरिकांना ने-आण करण्यासाठी ई-बसेस, रिक्षा, सायकल्स यांच्या मुबलक सोयी उपलब्ध केल्यास मेट्रो रेल्वे पद्धती यशस्वी होते. बॅटरीवर चालणाऱ्या बसेस या प्रदूषण नियंत्रण आणि खर्च कपात साध्य करून प्रवाशांना मेट्रो स्टेशनपर्यंत सहज वेळेत आणि सुलभ पोचवतील.
४) मल्टी मोडल सिस्टीममध्ये स्वतःचे खासगी वाहन ठराविक अंतरापर्यंत नेऊन पुढे मेट्रो सेवा घेणे, यातून पार्किंग स्पॉटस्, तिकीट खिडक्या, दुचाकी उपलब्ध करून देणे अशा रोजगार निर्मितीला चालना मिळू शकते.
५) वाहतुकीच्या विविध पद्धतींसाठी जर एकच स्मार्ट कार्ड वापरता येणे शक्य करून दाखवले तर उदा. बस, मेट्रो ट्रेन आणि ई-रिक्षा या सर्व सेवांसाठी एकच स्मार्टकार्ड आणि सदर वाहनांच्या वेळापत्रकाची जोडणी करून ठराविक क्षेत्रात फ्री वायफाय सेवा उपलब्ध करून दिली तर कामगार व विद्यार्थी आनंदाने या नव्या वाहतुकीच्या मार्गाचा अवलंब करतील. आतापर्यंत पुण्यात सर्व गर्दीच्या रस्त्यांवर विशिष्ट वेळेत वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषणातून सर्व वाहने एकाच रस्त्यांवरून हळू-हळू पुढे सरकताना दिसतात. हे चित्र आता पालटू लागेल. प्रत्येकाला स्वतंत्र वाहन ही पुणेकरांनी नाइलाजाने स्वीकारलेली चैन हळूहळू कमी होईल.
६) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामुळे (पीएमआरडीए) स्थापना २०१५ त होऊन पुण्याला जागतिक दर्जाचे विकास इंजिन बनविणे, सुलभ उद्योग वातावरण निर्मिती, संस्कृतिक वारसा विकास इ. उद्दिष्टांचा समावेश त्यात केला आहे.
७) मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग ॲण्ड अर्बन अफेअर्सच्या सर्वेक्षणाने असे स्पष्ट केले आहे की, पुण्याचा लिव्हेबल इंडेक्स ६६.२७ असून जो संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. लिव्हेबल इंडेक्स म्हणजे राहण्यासाठी सुयोग्य असलेल्या ठिकाणाचा निर्देशांक. हा निर्देशांक शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता या सोयींवर अवलंबून असतो. महामेट्रो प्रकल्पामुळे वाहतुकीच्या क्षेत्रात नवीन पाऊल पुढे पडेल. उद्योगनगरीचा वेग वाढेल. पुण्याच्या आसपासच्या उद्योग वस्त्या खऱ्याअर्थाने विकासाच्या वाहक बनतील आणि कॉरिडॉर तीन हिंजवडीच्या नियोजित मेट्रो प्रकल्पामुळे लवकरच पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी भविष्यात कमी होईल.

पुण्यातील बच्चेकंपनीची लाडकी फुलराणी आणि विद्यार्थी, कामगार तथा सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर होणारी महानगरातील मेट्रो ट्रेन लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही, अशी खात्री आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com