Railway
Railwaysakal

रेल्वेच्या ब्लॉकमुळे रविवारी पुण्यातील दोन एक्स्प्रेस रद्द

मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे ते दिवादरम्यान पायाभूत कामांसाठी चोवीस तासांचा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांवर परिणाम होणार आहे.
Summary

मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे ते दिवादरम्यान पायाभूत कामांसाठी चोवीस तासांचा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांवर परिणाम होणार आहे.

पुणे - मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे ते दिवादरम्यान पायाभूत कामांसाठी चोवीस तासांचा ब्लॉक (Block) घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांवर परिणाम (Effect) होणार आहे. पुणे स्थानकावरून धावणारी डेक्कन क्वीन व डेक्कन एक्स्प्रेस (Express) या गाड्या रविवारी (ता.२) रद्द (Cancel) करण्यात आल्या आहेत.

हा ब्लॉक रविवारी (ता.२) रात्री दोनपासून ते सोमवारी (ता. ३) पहाटे दोन वाजेपर्यंत असणार आहे. यामुळे उपनगरीय सेवा, मेल आणि एक्स्प्रेस रेल्वे गाड्या धीम्या गतीने, विलंबाने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

 Railway
महापालिकेला नोकर भरतीसाठी ठरवावा लागणार प्राधान्यक्रम

रद्द केलेल्या गाड्या

* शनिवारी (ता. १) : अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस

* रविवारी ( ता. २) : मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-गदग एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस

* सोमवार ( ता. ३) : आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, गदग-मुंबई एक्स्प्रेस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com