सावध ऐका पुढल्या हाका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावध ऐका पुढल्या हाका
सावध ऐका पुढल्या हाका

सावध ऐका पुढल्या हाका

sakal_logo
By

सावध ऐका पुढल्या हाका!

धनंजय बिजले

नववर्षांची सुरवात उत्साहाने झाली असली तरी तिला काळजीची किनार आहेच. जगभर थैमान घालणारा कोरोनाचा ओमीक्रॉन विषाणू आतापर्यंत आपल्यापासून दूर होता. पण गेल्या काही दिवसांत त्याने मुंबई, पुण्यात आपले अस्तित्व दाखवण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटांमध्ये पुण्याला फार मोठा फटका सहन करावा लागला आहे. आतापर्यंत एकट्या पुणे जिल्ह्यात कोरोनाने नऊ हजारांवर लोकांचा बळी घेतला आहे. आर्थिक हानी किती झाली याची तर मोजदादच नाही. अशा परिस्थितीत कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन, महापालिका, सर्वसामान्य नागरिक सर्वांनीच वेळीच सावध होण्याची गरज आहे.

रुग्णसंख्येचा वाढता आलेख
गेल्या गुरुवारी (ता. २७) पुण्यात अवघे ७७ रुग्ण होते. मात्र चार दिवसांत रोज रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात ३९९ रुग्णांची भर पडली आहे. शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०७० वर पोहोचली आहे. कोरोनाशी दोन करीत ‘न्यू नॉर्मल़ जीवनशैली कशी जगायची याची माहिती आता एव्हाना प्रत्येकालाच झालेली आहे. मात्र दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आजूबाजूला कोठेही नजर टाकली तरी याचा सहज प्रत्यय येतो आहे. त्यामुळेच रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे, आणि हीच खरी काळजीची बाब आहे.

आरोग्य यंत्रणेवर ताण नको
ताप आल्यास तत्काळ चाचणी करणे, सतत मास्क वापरणे आणि लसीकरण ही त्रिसूत्री यापुढे फायदेशीर ठरणार आहे. गर्दी कमी तितका प्रसार कमी त्यामुळे सध्यस्थितीत प्रत्येकाने अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे. प्रत्येकाने मास्कसुद्धा घातलाच पाहिजे. येत्या सोमवारपासून १५ ते १५ वयोगटातील तरुणांचे लसीकरण सुरु होत आहे तर १५ तारखेपासून ज्येष्ठांना तसेच फ्रंटलाईन वकर्सना तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. सर्व पात्र व्यक्तींनी त्याच लाभ घ्यायला हवा. कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटांमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचे आपण अनुभवले आहे. ऑक्सिजनची मागणी प्रमाणापेक्षा जास्त वाढली की आरोग्य यंत्रणा कोलमडते. हे टाळायचे असेल तर टेस्टिंग, मास्किंग व लसीकरण यावर भर देत आरोग्य यंत्रणेला साथ दिली पाहिजे तरच आपण संभाव्य तिसरी लाट रोखू शकणार आहोत. प्रत्येक गोष्ट शासनाने, महापालिकेने करायची असे म्हणून आता चालणार नाही. शासकीय पातळीवर जी काळजी घ्यायला हवी ती ते घेतली जाईलच. पण संसर्गाचा प्रसार खऱ्या अर्थाने रोखायचा असेल तर समूहाची साथ महत्त्वाची असते. यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर कोरोनाची त्रिसूत्री पाळत आपला खारीचा वाटा उचलायला हवा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top