पुणे शहर परिसरामध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे शहर परिसरामध्ये
ढगाळ हवामानाचा अंदाज
पुणे शहर परिसरामध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज

पुणे शहर परिसरामध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज

sakal_logo
By

पुणे, ता. २ : शहर परिसरात किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत असून रविवारी सकाळपर्यंत विविध ठिकाणी किमान तापमान १४ अंशाच्या पुढे नोंदले गेले. पुढील दोन दिवसानंतर ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

परिसरात शनिवारी (ता. ८) दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होणार असून पुढील आठवड्याभरात पुण्यातील विविध ठिकाणी किमान तापमानाचा पारा १९ ते २१ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात काहीसा चढ-उतार पाहायला मिळेल. परिणामी शहर परिसरात थंडीचा कडाका कमी होण्याची शक्यता आहे.

रविवारी नोंदविलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
ठिकाण : कमाल : किमान
पुणे ः २९.२ ः १५.७
पाषाण ः २७.३ ः १६.१
लोहगाव ः २८.२ ः १७.१

राज्यात थंडी झाली कमी
पुणे : राज्यातील किमान व कमाल तापमानात वाढ होत असल्याने गारठा कमी होत आहे. पुढील दोन दिवस राज्यातील किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही. त्यानंतर किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या अनेक भागात सकाळी धुके पडत असून, काही ठिकाणी दुपारी ढगाळ वातावरण तयार होत आहे. रविवारी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे ८.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३४.२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

नव्याने तयार झालेल्या दोन पश्‍चिमी चक्रावाताची (वेस्टर्न डिस्टर्बन्स) स्थिती आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वायव्य आणि मध्य भारतात पुढील आठवडाभर थंडी वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी होणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top